Maharashtra Assembly Election : विधानसभेसाठी नितीन गडकरी अॅक्शनमोडमध्ये, फडणवीस-बावनकुळेंसोबत २ तास खलबतं

Maharashtra Assembly Election 2024 : दिल्लीमधून परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट नितीन गडकरी यांच्या घरी गेले. तिथे त्यांची दोन तास चर्चा झाली. दुसऱ्या यादीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचे समजतेय.
nitin gadkari devendra fadnavis
Vidarbha Politicssaam tv
Published On

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणापासून दूर असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी आता कार्यरत झाल्याचे दिसत आहे. विदर्भात लोकसभेला महायुतीला जोरदार धक्का बसला होता, त्यामुळे गडकरी राज्यातील निवडणुकीवेळी अॅक्शनमोडमध्ये आल्याचे समोर आलेय. गुरुवारी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. (nitin gadkari devendra fadnavis)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोन तास बैठक चालली. नागपुरात नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही उपस्थित होते. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर फडणवीस आणि बावनकुळे हे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपुरात दाखल झाले होते. विमानतळावरुन ते थेट नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले होते. गडकरी, फडणवीस आणि बावनकळे या तिन्ही नेत्यांमध्ये भाजपच्या दुसऱ्या यादीपूर्वी सुमारे दोन तास खलबते झाली.

फडणवीस आणि बावनकुळे यांनी बैठकी संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तरी भाजपच्या उद्या जाहीर होणाऱ्या यादी संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

nitin gadkari devendra fadnavis
Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यांच्यासोबत पूर्व नागपूरचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, दक्षिणचे मोहन मते हे उमेदवारही आपला अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळी 10.15 वाजताच सुमारास देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जातील, तिथं औक्षवन होईल. त्यानंतर संविधान चौकात 10.40 वाजताचा सुमारास पोहचतील. 11 वाजता दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात जाऊन नामांकन अर्ज दाखल करतील.

सहाव्यांदा आमदारकीसाठी मैदानात उतरणार -

देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत. त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com