Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

Life Lesson : आपल्या रोजच्या जीवनातील सर्व गोष्टी मग त्यामध्ये आनंद दु:ख देखील आपण सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र असे करणे म्हणजे संकटांना आणि अडचणींना निमंत्रण दिल्यासारखे आहे.
Saam TV
Life Success TipsSaam TV

आजकाल प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टीव आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण सोशल मीडिया वापरतात. आपल्या रोजच्या जीवनातील सर्व गोष्टी मग त्यामध्ये आनंद दु:ख देखील शेअर करतात. मात्र असे करणे म्हणजे संकटांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या कधीच कुणालाही शेअर करायच्या नसतात. त्या गोष्टी कोणत्या त्याबाबत आज महिती जाणून घेऊ.

Saam TV
Life Secrets: लोकांशी बोलताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल पश्चात्ताप

आपल्या आयुष्यातील अडचणी

अडचणी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात. मात्र अडचणी आल्याने खचून न जाता त्यांचा सामना करायचा असतो. मात्र अनेक व्यक्ती आपल्यावर आलेल्या आव्हानांचा सामना न करता हताश होतात. तसेच कुणाला शेअर केलं तर दु:ख हलकं होतं असं म्हणतात मात्र तसं काही नसतं. अनेकदा व्यक्ती तुमच्यासमोर तुमचं दु:ख ऐकून घेतात आणि नंतर तुमच्यामागे त्या गोष्टीचा गैरफायदा घेतात. त्यामुळे आपली कमजोरी कुणालाही कळू देऊ नका.

समोरचं ध्येय कुणाला सांगू नका

अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जे काही करणार असतात त्याची माहिती आधीच इतर व्यक्तींना सांगतात. याचं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर, एक तरुण शिक्षण, नोकरी यांच्यासह पोलीस होण्याचं स्वप्न पाहत होता. त्यासाठी घेत असलेली मेहनच तो नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकायचा. मात्र शेवटी भरती परीक्षेत त्याला अपयश आलं. अशा विविध गोष्टींमध्ये तरुण मुलं मुली ध्येयाबाबत आधीच गाजावाजा करत फिरतात.

जोडीदाराबद्दल काहीच सांगू नका

अनेक तरुण तरुणी आपल्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल आपल्या मित्र परिवारात सांगत असतात. मात्र असं केल्याने त्या नात्याला नजर लागते आणि नातं तुटतं. यासह काहीवेळा पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि वाद या गोष्टी देखील शेअर करणं चुकीचं आहे. त्यावरून लोक आपल्या नात्याला त्यांच्या पद्धतीने जज करतात. याचा आपल्या नात्यावर आणखी दुष्परिणाम होतो.

काहीवेळा अपहरणाच्या गोष्टी देखील सोशल मीडियामुळे झाल्याचं समोर आलं आहे. आपण सकाळी केव्हा उठलो, स्टेशला केव्हा पोहचलो, ऑफिसमध्ये काय झालं या सर्वांचे फोटो आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करतो. इतकंच नाही तर मन आनंदी आणि दु:खी असल्यास त्यानुसार त्याचे कोट्स देखील सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्यामुळे आपल्यावर जण कुणी वॉच ठेवली असेल तर त्या व्यक्तीला काहीही न करता आपली सर्व माहिती आपण स्वत:च त्याला नकळतपणे देतो.

Saam TV
Happy Life : खुश राहायचे आहे? रोजच्या जीवनात करा बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com