विधानसभा निवडणुकीआधीच 8 आमदारांचं तिकीट कापलं; दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

AAP Announces 31 Candidates For Punjab Elections 2027: पंजाब विधानसभा निवडणूक 2027 साठी आम आदमी पार्टीने 31 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 8 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले असून, दोन खासदारांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
Punjab Assembly Elections 2027
Punjab Assembly Elections 2027saam tv
Published On: 

पंजाब विधानसभा निवडणूक 2027 साठी आम आदमी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 31 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने नव्या चेहऱ्यांसमोर जुन्या कार्यकर्त्यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे, 8 विद्यमान आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Punjab Assembly Elections 2027
ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

या यादीत दोन खासदारांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. यामध्ये संगरूरचे खासदार गुरमीत सिंह मीत हेयर यांचा समावेश आहे. त्यांना बरनाल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. AAP ला 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता, अशा जागांवरही उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने दिलेल्या महितीनुसार, दुसऱ्या यादीतील 21 मतदारसंघांमध्ये 2022 मध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच 8 विद्यमान आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

Punjab Assembly Elections 2027
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळेत ४५ मिनिटांचा बदल; नवीन टाइम काय?

जालंधरच्या तीन महत्त्वाच्या जागांवरही उमेदवार जाहीर

आम आदमी पार्टीने जालंधरमधील तीन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांसाठीही उमेदवारांची घोषणा केली आहे. जालंधर सेंट्रलमधून नितीन कोहली, जालंधर नॉर्थमधून वनीत धीर, तर जालंधर कँटमधून दीपक बाली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदमपूर विधानसभा मतदारसंघातून पवन कुमार टीनू यांना तिकीट देण्यात आले आहे. तर कपूरथलामधून देविंदर पाल सिंह रंगा आणि फगवाडामधून डॉ. राजकुमार चब्बेवाल निवडणूक लढवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.