भररस्त्यात आमदाराच्या कानफटात मारली; राजकारणात खळबळ

AAP MLA Chaitar Vasava Slap Incident Viral Video: गुजरातमधील भरूच येथे स्फोटानंतर आमदार आणि पीडित कुटुंबीयांमध्ये भररस्त्यात धक्कादायक मारहाणीची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
AAP MLA Chaitar Vasava seen in a heated altercation with a victim’s family member at the Bharuch blast site, video goes viral.
AAP MLA Chaitar Vasava seen in a heated altercation with a victim’s family member at the Bharuch blast site, video goes viral.saam tv
Published On

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झगडिया GIDC मध्ये आम आदमी पक्षाचे आमदार चैतर वसावा आणि स्फोट झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांमध्ये जोरदार राडा झाला. मेट्रोपॉलिटिन एक्सीकेम प्लांटमध्ये झालेल्या भेटीदरम्यान दोन्ही बाजूनी एकमेकांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमके प्रकरण काय?

23 एप्रिल रोजी मेट्रोपॉलिटन एक्सीकेम प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला होता. या अपघातात 10 हून अधिक कामगार जखमी झाले होते. यामध्ये राजन वसावा नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे लोक आधीच संतापले होते.

AAP MLA Chaitar Vasava seen in a heated altercation with a victim’s family member at the Bharuch blast site, video goes viral.
राघव चड्ढानंतर अरविंद केजरीवाल यांना आणखी एक झटका; बड्या नेत्याचा आम आदमी पक्ष सोडला!

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी प्रशासन आणि पीडित कुटुंब यांच्यात नुकसानभरपाईबाबत चर्चा सुरू होती. यादरम्यान आमदार चैतर वसावा तिथे पोहोचले. मात्र, त्यांच्या येण्याला पीडित कुटुंबाने विरोध केला. या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत झाले. रागाच्या भरात आमदारांनी पीडित कुटुंबातील एका तरुणाला चापट मारली, यालाच उत्तर म्हणून त्या तरुणानेही आमदाराच्या कानशिलात लगावली.

AAP MLA Chaitar Vasava seen in a heated altercation with a victim’s family member at the Bharuch blast site, video goes viral.
#Shorts : Pune Accident News | पुण्यात 4 वाहनांचा विचित्र अपघात

मृत झालेल्या राजन वसावा यांचा भाऊ रोशन वसावा याने आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. रोशन म्हणाला, आम्ही आमदारांना बोलावले नव्हते, तरीही ते वातावरण खराब करण्यासाठी कंपनीत आले. चैतर वसावा हे केवळ कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी आले होते आणि ते लोकांना दिशाभूल करत आहेत. जर येथे काही दंगल झाली, तर त्याला सर्वस्व आमदारच जबाबदार असतील. रोशन वसावा यांनी पुढे स्पष्ट केले की, कंपनीसोबत आमचा परस्पर संमतीने नुकसानभरपाईचा करार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com