

बुलडाण्याच्या खामगावमध्ये भयंकर हत्याकांड
मध्यरात्री तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या
नाचताना धक्का लागल्यावरून वाद
४ ते ५ जणांकडून धारदार शस्त्राने हल्ला
२३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
नाचताना धक्का लागल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुलडाण्याच्या खामगाव शहरात मध्यरात्री ही घटना घडली. ४ ते ५ जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जास्त रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात मध्यरात्री ही घटन घडली. डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यावसन थेट हत्येच्या थरारत झाले. चार ते पाच जणांनी एका २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून हत्या केली. तरुणाचा जीव जाईपर्यंत आरोपींनी त्याच्यावर हल्ला करत राहिले. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.
शोएब खान अमीन खान (२३ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव होते. खामगावच्या बर्डे प्लॉट परिसरात तो कुटुंबीयांसोबत राहत होता. याच भागातील स्मशानभूमीच्या जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना तरुण नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा एका तरुणाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान अमीन खान यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर ४ ते ५ जणांनी त्याच्या हत्येचा कट रचत त्याला संपवलं. घटनेचा तपास खामगाव पोलिस करत आहेत.
दरम्यान, पुण्यामध्ये देखील अशीच घटना घडली. लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादानंतर संतप्त झालेल्या चौघांनी तरुणाची हत्या केली. तेजस पिलाने असं हत्या झालेल्या तरुणाचे नावहोते. या प्रकरणी पुण्याच्या भारती पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे पुणे हादरले. सध्या पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.