Monkey Attack: माकडाने ३ वर्षांच्या मुलीला उचलून नेलं; डोंगरावरून खाली फेकलं, खळबळजनक घटना

Monkey Attack News: कधी कधी तर माकडं लहान मुलांना एकटं गाठतात, त्यांना उचलून नेतात. असाच काहीसा प्रकार एका ३ वर्षांच्या मुलीसोबत घडला आहे.
 A 3-year-old girl was snatches by a monkey Thrown down from the mountain Shoking incident
A 3-year-old girl was snatches by a monkey Thrown down from the mountain Shoking incident Saam TV

Monkey Attack Video

माकडांचा उच्छाद जीव नकोसा करून टाकणारा ठरतो. कधी चालत्या गाडीवर उडी मारणे, तर कधी मौल्यवान सामानांची चोरी करण्यात माकडं पटाईत असतात. कधी कधी तर माकडं लहान मुलांना एकटं गाठतात, त्यांना उचलून नेतात. असाच काहीसा प्रकार एका ३ वर्षांच्या मुलीसोबत घडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 A 3-year-old girl was snatches by a monkey Thrown down from the mountain Shoking incident
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; घरात घुसून एकाची हत्या, परिसरात खळबळ

आई-वडील कामात व्यस्थ असताना अचानक माकड आलं आणि ३ वर्षांच्या मुलीला डोंगरावर घेऊन गेलं. मुलगी कुठेही दिसत नसल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलगी कुठेही आढळून न आल्याने आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. (Latest Marathi News)

आपल्या मुलीचं अपहरण झालं असावं, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना होता. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. ज्या परिसरातून मुलगी बेपत्ता झाली होती. त्या परिसरात पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. तब्बल दोन तासांनंतर एका माकडाजवळ मुलगी असल्याचं पोलिसांना दिसून आलं.

पोलिसांनी या माकडाचा पाठलाग केला. मात्र, त्याने डोंगरावरुन मुलीला खाली फेकून दिलं. त्यानंतर चिमुकली एका झुडपात पडली. सुदैवाने या घटनेत मुलीला कुठलीही दुखापत झाली नाही. चीनच्या दक्षिण-पश्चिम गुइझोउ प्रांतात घडला आहे. मुलीचे वडील लियू यांनी घटनेबाबत सांगितलं, की त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीला झाडाच्या सावलीत बसवलं होतं.

त्याचं लक्ष काही सेकंदांसाठी दुसरीकडे गेलं आणि तोपर्यंत मुलगी तिथून बेपत्ता झाली. लियू म्हणाले, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर मुलीची आई रडू लागली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनीही मुलीची शोधाशोध घेतली. आमच्या मुलीचं अपहरण झालं असावं, असा संशय आम्हाला होता. त्यानंतर आम्ही पोलिसांत धाव घेतल्याचं लियू यांनी सांगितलं.

 A 3-year-old girl was snatches by a monkey Thrown down from the mountain Shoking incident
Train Accident: आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण; अधिकाऱ्यांनी दिली चक्रावून टाकणारी माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com