Train Accident: आंध्र प्रदेशातील रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण; अधिकाऱ्यांनी दिली चक्रावून टाकणारी माहिती

Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Andhra pradesh train accident reason
Andhra pradesh train accident reasonSaam TV
Published On

Andhra Pradesh Train Accident

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी दोन रेल्वेगाड्यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याबाबतची माहिती समोर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Andhra pradesh train accident reason
Maratha Reservation: आरक्षण कधी मिळेल, हे मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील; चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

रेल्वे अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, विझियानगरम येथून रायगडच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेने विशाखापट्टणम ते पलासा पॅसेंजर ट्रेनला (Train Accident) समोरुन धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामधील एका ट्रेनचे तब्बल ४ ते ५ डबे रुळावरुन खाली घसरले. या भीषण दुर्घटनेत काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर वीज तारा तुटल्याने घटनास्थळी अंधार पसरला होता. त्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या. प्रवाशांना आणि अधिकाऱ्यांना मोबाईल फोनच्या टॉर्चच्या मदतीने प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं. (Latest Marathi News)

रेल्वे अपघाताचं धक्कादायक कारण

दरम्यान, हा अपघात सिग्नल यंत्रणेच्या चुकीमुळे हा झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. अपघाताबाबत माहिती देताना, ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) ने सांगितले की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केल्याने ही टक्कर झाली असावी. दाचित विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेनचा सिग्नल ओव्हरशूट झाला असेल.

त्यामुळे ट्रेन रेड सिग्लवर थांबण्याऐवजी चूकुन पुढे गेली. अपघाताबाबत सखोल चौकशी केली जाईल, असं सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं मोदींनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील अपघातावर शोक व्यक्त केला असून जखमींना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com