Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भयंकर अपघात, भरधाव बसची ट्रेलरला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू
Rajasthan AccidentSaam Tv

Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भयंकर अपघात, भरधाव बसची ट्रेलरला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

Rajasthan Accident: राजस्थानमध्ये भरधाव बसने ट्रेलरला धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published on

Summary -

  • राजस्थानच्या बालोतरा जिल्ह्यात भीषण अपघात

  • खासगी बस आणि ट्रेलरची जोरदार धडक

  • अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

  • तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत

राजस्थानमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जोधपूरवरून सांचौरला जाणाऱ्या एका खासगी बसने ट्रेलरला धडक दिली. ही अपघाताची घटना बालोतरा जिल्ह्यातील कल्याणपुर क्षेत्रमध्ये घडली. सरवडी गावाजवळ ओव्हरटेक करत असताना बस आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये बस ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की बसच्या काचा तुटल्या आणि अनेक प्रवासी आतमध्ये अडकले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. स्थानिकांनी बसचा आपत्कालीन दरवाजा आणि तुटलेल्या काचांमधून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ बालोत्रा येथील रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात हलवण्यात आले.

Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भयंकर अपघात, भरधाव बसची ट्रेलरला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू
Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

एसीपी छावी शर्मा यांनी सांगितले की, अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाना देवासी (सायला) यांचा मुलगा नागराम, भगवानराम (संचोर) यांची मुलगी अनुषा, नरपत (चितळवाना), युवराज (५ वर्षे) आणि शिवराज (१५ महिने) यांचा समावेश आहे. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भयंकर अपघात, भरधाव बसची ट्रेलरला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : भाजपच्या नेत्याचं अपघाती निधन, महिनाभरापूर्वीच स्वीकारली होती मोठी जबाबदारी

पोखरण सरकारी रुग्णालयातील नर्सिंग सदस्य धारू राम यांनी सांगितले की, ते त्यांच्या कुटुंबासह घरी परत येत होते. अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची बायको गंभीर जखमी झाली आणि तिचा पाय कापावा लागला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात भयंकर अपघात, भरधाव बसची ट्रेलरला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : मध्यरात्री महामार्गावर भयंकर अपघात, सहा वाहने एकमेकांना धडकली अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com