४ मुलींवर ७ जणांकडून आळीपाळीनं सामूहिक अत्याचार, नराधमांनी अर्ध्या रात्री डाव साधला | Shocking Crime

4 tribal girls physically assaulted by 7 mens: तीन अल्पवयीन मुलींवर आणि एका तरूणीवर सात नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ३ तासांत आरोपींना अटक केली आहे.
madhya pradesh
madhya pradeshSaamTV
Published On

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हट्टा पोलीस स्टेशन परिसरातून समोर येत आहे. तीन अल्पवयीन मुलींवर आणि एका तरूणीवर सात नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

२३ एप्रिल रोजी २ वाजेच्या सुमारास मुली एका लग्न समारंभातून परतत होते. त्यांच्यासोबत एक मुलगाही होता. त्या ठिकणी सात तरूण दोन दुचाकीवरून आले. नराधमांनी त्या मुलाला हाकलून लावले आणि मुलींना निर्जनस्थळी घेऊन गेले. तसेच आळीपाळीने सातही तरूणांनी ४ मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

madhya pradesh
Beed: कासलेनंतर सायबरमधील आणखी एक पोलिस बडतर्फ, शिवीगाळ अन् धमक्या देणं अंगलट

पीडित मुलींनी त्यानंतर २४ एप्रिलला हट्टा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितांनी तक्रार दाखल करताच पोलीस अधीक्षक नागेंद्र सिंह यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार केले. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली. लोकेश मात्रे, लालचंद खरे, अज्जू बगदाते, अजेंद्र बहे, राजेंद्र कावरे, मणिराम बहे आणि या आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे.

madhya pradesh
Kashmir Attack: दहशतवाद्यांचा गोळीबार, पर्यटकांसाठी धावला ‘देवदूत’; बाळाला वाचवणाऱ्या काश्मिरी मुलाचा VIDEO व्हायरल

आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेसंदर्भात एसपी नागेंद्र सिंह म्हणाले की, 'घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे. आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळावून देण्यात यावी यासाठी प्रयत्न करू', असं पोलीस अधीक्षक म्हणाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com