Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Cricket Player Death Uttar Pradesh : क्रिकेट खेळताना तरुणाचा मैदानावरच मृत्यू झाला. बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू
Uttar Pradesh NewsSaam Tv
Published On
Summary

क्रिकेट खेळताना तरुणाचा मैदानावर मृत्यू

मृत तरुण एलआयसी अधिकारी होता

बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायल्याने मृत्यू

शवविच्छेदनानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल

या घटनेमुळे परिसरात खळबळ

उत्तर प्रदेशातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका तरुणाचा क्रिकेट खेळताना मैदानावरच मृत्यू झाला. धक्कदायक म्हणजे या तरुणाने बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रवींद्र अहिरवार (३० वर्षे) असे आहे. रवींद्र झाशी येथील एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करत होता. रवींद्र पूर्णपणे निरोगी होता आणि नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याच्या वडिलांसोबत चहा प्यायला. त्यानंतर सिप्री बाजार पोलिस स्टेशन परिसरातील जीआयसी मैदानावर रवींद्र क्रिकेट खेळण्यासाठी गेला.

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू
Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

क्रिकेट मॅच दरम्यान रवींद्रकडे बॉलिंगची जबाबदारी होती. रवींद्रच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्याची बॉलिंग झाल्यांनतर त्याला तहान लागली. तहान लागली म्हणू तो पाणी प्यायला. पाणी पिल्यानंतर त्याला अचानक उलट्या झाल्या आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब झाशी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू
Crime News : पुण्यात तोडफोडीचे सत्र कायम! सोसायटीमधील CCTV आणि वाहने फोडली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

झाशी मेडिकल कॉलेजचे सीएमएस डॉ. सचिन माहोर यांनी सांगितले की, तरुणाला मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. खेळताना किंवा व्यायाम करताना तहान लागल्यावर जास्त पाणी पिल्याने ही समस्या उद्भवू शकते, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान रवींद्रचा नक्की कशामुळे झाला याकडे सर्वांचे लक्ष आहे. रवींद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com