Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत असून तापमानात घट जाणवू लागली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची औपचारिक सुरुवात होणार आहे.
Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather AlertSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होत असून हवेत गारवा जाणवू लागला आहे

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे

जळगाव जिल्ह्यात सकाळी धुक्याची चादर पसरली

पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची औपचारिक सुरुवात होणार

महाराष्ट्रात तापमानात चढ उतार होत असल्याने पावसाचा जोर हळूहळू कमी होत आहे. कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वर असून, किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली येऊ लागला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. शिवाय समुद्रातील चक्रीवादळाचं संकट हळूहळू ओसरत आहे.पुढील चार ते पाच दिवसात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होईल.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने आज कमी अधिक प्रमाणात पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. पुढील काही दिवसात पाऊस राज्याची रजा घेणार आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात बांगलादेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

राज्यात आज कोकण, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल व किमान तापमानात चढ - उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जळगाव जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून आज सकाळी वातावरणात धुकं पाहायला मिळालं.

Weather Alert : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, अवकाळीपासून सुटका होणार, 'या' तारखेपासून गारठा वाढणार, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

जळगाव जिल्ह्यावर धुक्याची चादर

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असून, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड हवा दक्षिणेकडे सरकत आहे. या कारणास्तव शहर व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसांत हिवाळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहराने धुक्याची चादर पांघरली होती. त्यामुळे दृश्यमानता १०० मीटरपर्यंत होती. कोल्हे हिल्स, पिंप्राळा, सावखेडा शिवार, गिरणा परिसरात दृश्यमानता ७० मीटरवर होती. जळगाव जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबरपासून थंडी तर ८ तारखेनंतर गारठा जाणवेल. किमान तापमान १३ ते १७ तर कमाल तापमान २९ ते ३१ अंश राहील. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून हवेत काहीसा कोरडेपणा आणि गारवा जाणवेल परिणामी आर्द्रता देखील घटेल व त्यामुळे थंडीचा जोर हळूहळू वाढेल. थंडीचे आगमन होणार असल्याचे हवामान अभ्यासक यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com