Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Maharashtra Weather News : अंदमान समुद्रात नव्या वादळाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता वाढली आहे. पुढील ४ ते ५ दिवस कोकण, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा
Maharashtra Weather NewsSaam tv
Published On
Summary

उत्तर अंदमान समुद्रात नव्या वादळाची निर्मिती

राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता

कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांना येलो अलर्ट

दोन दिवसांत पावसाची उघडीप

राज्यावर आलेलं मोंथाचं संकट जरी निवळलं असलं तरी उत्तर अंदमान समुद्रात नवं वादळ घोंगावत आहे. या वादळामुळे पुन्हा एकदा पावसाला पोषक असं वातावरण निर्माण होत आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज रत्नागिरीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दोन दिवसांनंतर राज्यात पावसाची उघडीप मिळणार असून, त्यानंतर किमान तापमानात घट होत गारठा वाढत जाण्याचा अंदाज आहे.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा
Pune Metro News : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो टप्पा-2 ला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान उत्तर अंदमान समुद्रात पृष्ठभागावरील वारे ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने आणि वारे ताशी ५५ किलोमीटर वेगाने वाहतील. या काळात समुद्रातील परिस्थिती खवळलेली राहण्याची अपेक्षा वर्तवली आहे. अंदमान आणि निकोबार किनाऱ्यांवर ४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत लाटांचा इशारा देण्यात आला होता. उत्तर, मध्य आणि दक्षिण अंदमान तसेच निकोबार जिल्ह्यांमध्ये ६ नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळ सुरू राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. या कालावधीत वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहू शकतात.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा
Badlapur News : निवडणुकीच्या घोषणेआधीच बदलापूरला मोठी भेट, २४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर, जीआर पण काढला

याचा परस्पर परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून नागरिकांना थंडीची चाहूल लागण्या ऐवजी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे छत्री घेऊन बाहेर पडावं लागत आहे. हवामान खात्याने देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुढील ४ ते ५ दिवस राज्यातील जिल्ह्यांना पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com