पुलवामात झालेल्या चकमकीत ३ दहशदवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून चकमक सुरू आहे.
पुलवामात झालेल्या चकमकीत ३ दाहशदवाद्यांचा खात्मा; एक जवान शाहिद
पुलवामात झालेल्या चकमकीत ३ दाहशदवाद्यांचा खात्मा; एक जवान शाहिदSaam Tv
Published On

श्रीनगर : दहशतवादी Terrorist आणि सुरक्षादलामध्ये Security forces जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने या भागाला घेराव घातला होता. आजच्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना टिपले आहे. तर सुरक्षादलातील एक जवानही या चकमकीत शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप संपलेली नाही. तर दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरू आहे. 3 terrorists killed in encounter in Pulwama

सुरक्षादलाकडून संयुक्तरित्या ही मोहीम राबवण्यात येते आहे. यामध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि सेनेच्या ४४ आरआरच्या जवानांचा देखील समावेश आहे.

हे देखील पहा-

विजय कुमार काश्मीर विभागाचे पोलीस महासंचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चकमक पुलवामाच्या हाजिन राजपोरा भागात सुरू आहे. लष्कर ए तोयबाशी या चकमकीत ठार झालेले तीघेही जण संबंधित आहेत. 3 terrorists killed in encounter in Pulwama

पुलवामात झालेल्या चकमकीत ३ दाहशदवाद्यांचा खात्मा; एक जवान शाहिद
आता शहरातील मृत पशूंवर होणार अंत्यसंस्कार

सुरक्षादलाने चारही बाजुंनी घेरल्यानंतर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सुरक्षादलावर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. याला सुरक्षादलानेही चोख प्रत्यूत्तर दिले आहे. या गोळीबार दरम्यान एका जवान गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. सहकारी जवानांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलवले. परंतु, उपचारादरम्यान त्या जवानाचा मृत्यू झाला आहे. या चकमकीत शहीद आलेल्या जवानांचे नाव हवालदार काशी राव असल्याचे माहित झाले आहे.

दुसरीकडे, दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्येही पोलिसांच्या ताफ्यावर अचानक हल्ला चढवला. एक पोलीस या हल्ल्यात जखमी झाला आहे. या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.

Editing By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com