Mexico Bar Set On Fire: दारुड्याची सटकली! बारमधून बाहेर काढल्यामुळे लावली आग, ११ जणांचा मृत्यू

Mexico Police Arrested Man: या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी दारुड्याला अटक केली आहे.
Mexico Bar Set On Fire
Mexico Bar Set On FireSaam Tv
Published On

Mexico Fire News: मेक्सिकोमध्ये (Mexico) धक्कादायक घटना घडली आहे. दारुड्याला बारमधून बाहेर काढल्यामुळे संतप्त होत त्याने बारच पेटवून दिला आहे. बारला लागलेल्या भीषण आगीमध्ये (Mexico Bar Set On Fire) ११ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मेक्सिको देशातील उत्तर भागात असणाऱ्या सॅन लुईस रियो कोलोराडो या शहरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी दारुड्याला अटक केली आहे.

Mexico Bar Set On Fire
Andhra Crime News : पती पहिल्या पत्नीचे इन्स्टाग्रामवर बघत होता रील्स, दुसरी पत्नी संतापली अन् गुप्तांगच कापलं

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दारुड्याने बारमध्ये गैरवर्तन केले त्यामुळे त्याला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. याचाच राग मनामध्ये ठेवत त्याने थेट बारला पेटवून दिले. ही आग इतकी भीषण होती की, अनेकांना बारमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अशामध्ये या आगीमध्ये बारमध्ये उपस्थित असलेल्या ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

Mexico Bar Set On Fire
Rajasthan News: मन सुन्न करणारी घटना! बोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा मृत्यू; कारवाईच्या भितीने शेतमालकाने स्वतःलाही संपवलं

सोनोरा स्टेटच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती बारमध्ये आली होती. या व्यक्तीने खूपच दारु प्यायली होती. तो खूपच नशेमध्ये होता. त्याने बारमध्ये उपस्थित असलेल्या महिलांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याला बारमधून बाहेर काढण्यात आले होते. याचाच राग मनात धरुन या दारुड्याने बारला आग लावली. आग लावण्यासाठी दारुड्याने मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने बारमधून बाहेर पडताना मोलोटोव्ह कॉकटेल हे द्रव्य बारमध्ये फेकले आणि पेटवून दिले.

Mexico Bar Set On Fire
Andhra Pradesh Government Hospital: हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात ८ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर

सॅन लुईस रिको कोलेरॅडो येथील बिअर हाऊस कॅण्टेनिया नावाच्या बारमध्ये ही घटना घडली. दारुड्याने लावलेल्या आगीमध्ये बारचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की, ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. तर या आगीमध्ये ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये एका अमेरिकेच्या महिलेचा आणि १७ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेनंतर आरोपी दारुड्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी बारमध्ये आपत्कालीन दरवाजा नव्हता. बारला एकच दरवाजा होता आणि तो देखील बंद झाला होता. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही, असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com