Kalyan Crime : बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय; महिलेला घरात कोंडून मारहाण

Kalyan woman assaulted over alleged affair suspicion : बहिणीच्या नवऱ्यासोबत म्हणजेच भावोजींसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला घरात कोंडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Kalyan Crime : बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय; महिलेला घरात कोंडून मारहाण
Kalyan Crime news Khadakpada Police Stationsaam tv
Published On
Summary
  • भावोजींसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय

  • दोघांनी महिलेला घरात कोंडून केली मारहाण

  • कल्याणमधील धक्कादायक प्रकार

  • पोलिसांकडून तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

भावोजींसोबत म्हणजेच बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेला घरात कोंडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये हा प्रकार घडला आहे. महिलेच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बहिणीचा नवरा म्हणजेच भावोजींसोबत संबंध आहेत असा संशय एका महिलेवर घेण्यात आला. त्यावरून तिला घरात डांबले आणि मारहाण करण्यात आली. पीडित महिलेने खडकपाडा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी तिला एका महिलेचा फोन आला होता. लोनवाले साहेब आले आहेत, तुम्ही लगेच या असे तिला सांगण्यात आले. त्यावर ती संबंधित ठिकाणी पोहोचली.

महिलेला सांगितल्याप्रमाणे ती संबंधित घरी पोहोचली. त्याठिकाणी आधीच दोघे जण होते. त्यांनी तिला त्या घरातच डांबले. तिला बेदम मारहाण केली. तुझे आमच्या भावोजींसोबत संबंध आहेत, तुझी एवढी हिंमत कशी? असे म्हणत तिचा अपमान करण्यात आला. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Kalyan Crime : बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय; महिलेला घरात कोंडून मारहाण
Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, जवळपास दोन तास हा प्रकार सुरू होता. त्या व्यक्तीशी कोणताही संबंध नसतानाही आपल्यावर खोटे आरोप करून मारहाण करण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. याबाबत कल्याण विभागाचे एसीपी अशोक होनमाने यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासाच्या आधारे संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

Kalyan Crime : बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय; महिलेला घरात कोंडून मारहाण
Crime News : भावोजीच्या प्रेमात आकंठ बुडाली विवाहित मेहुणी; स्वतःच्याच बहिणीच्या हत्येचा रचला कट, पण स्वतःच गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com