Kalyan Dombivli : ठाकरेसेनेच्या नॉट रिचेबल नगरसेवकांचा शिंदेंसेनेला पाठिंबा? श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, नेमकं काय म्हणाले

Mahayuti government formation in Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेच्या चर्चांदरम्यान श्रीकांत शिंदे यांनी महायुतीतूनच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Kalyan Dombivli Municipal Corporation
Kalyan Dombivli Municipal CorporationSaam TV Marathi News
Published On

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी गट स्थापन करण्यासाठी शिंदेसेनेचे ५३ नगरसेवेक आज कोकण भवनात पोहचले होते. त्याशिवाय मनसेच्या ५ नगरसेवकांनीही गट स्थापना केली. राजू पाटील यांच्यासोबत मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदेसेनाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचे समजतेय. श्रीकांत शिंदेंनी याबाबत माहिती दिली. भाजपला शह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ही खेळी केल्याचं बोलले जातेय. श्रीकांत शिंदेंकडून भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन केली जाणार नाही, असे सांगितले. पण वंचित, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर नगरसेवकांचा एकूण आकडा सत्तास्थापनेच्या मॅजिक फिगरला पोहचत आहे. त्यामुळेच शिंदेंकडून भाजपला शह देण्यात येत असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले ?

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी निवडणुका वेगळ्या लढल्या असल्या तरी महायुतीमध्येच सत्ता स्थापन होणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन केली जाईल. भाजपासोबत सहकार्य घेऊन विकासकामे केली जातील. विकासासाठी कोणताही पक्ष आला तर आम्ही सोबत घेऊ. सर्व पक्ष एकत्र आल्यास विकासकामात अडथळे येणार नाहीत. सत्तेत स्थैर्य (Stability) राहील. भविष्यात विकासाच्या नावाने विकास केला जाईल. चांगले काम केल्यास कोणाकडूनही समर्थन मिळू शकते, असं उत्तर श्रीकांत शिंदेंनी दिले. त्यांना ठाकरेंच्या नगरसेवकांचा तुम्हाला पाठिंबा आहे, असा सवाल विचारण्यात आला होता.

Kalyan Dombivli Municipal Corporation
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

आम्ही फक्त गट स्थापनेसाठी आलो आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होईल. कुणाचा होईल, हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्या बैठकीनंतरच महापौर, उपमहापौरावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी म्हटलेय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ नेते राज्यातील प्रत्येक महापालिकांसाठी एकत्र बसून निर्णय घेतली. महाराष्ट्रात जिथे महायुती म्हणून आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर असेल, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

Kalyan Dombivli Municipal Corporation
Shiv Sena : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

भविष्याच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवलीसाठी जे लोकं सोबत येतील त्यांना सोबत घेणार आहे. मनसेनेही विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. मनसेनेकडून महायुतीला समर्थन देण्यात आले, असे शिंदे म्हणाले. कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांनी गट स्थापन केला आहे. त्यासोबत मनसेचे ५ नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी आले आहेत. मनसेने शिवसेनेला समर्थन दिले. उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजप, वंचित व अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली जाईल असे श्रीकांत शिंदेंनी सांगितले.

Kalyan Dombivli Municipal Corporation
Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

ठाकरेंच्या नगरसेवेकांचे काय ?

ठाकरेंच्या नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा की नाही, याबाबत आम्ही कसं सांगू. ते आमच्या संपर्कात नाहीत, फिरायला गेले असतल, असे मिश्किल उत्तर श्रीकांत शिंदेंनी दिले. कल्याण डोंबिवली अथवा इतर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदावर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण शक्य तो सगळीकडेच महायुतीचाच महापौर असेल. भाजपला बाजूला ठेवून काहीही होणार आहे. सत्तास्थापनेचे सर्व अधिकारी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि भाजपकडून रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार आहेत. त्यांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व गोष्टीवर चर्चा होणार आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Kalyan Dombivli Municipal Corporation
आयआयटीमध्ये पीएचडी विद्यार्थ्याची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून उडी मारली, कॅम्पसमध्ये शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com