Bmc Property Tax: खरंच मुंबईत मालमत्ता कर वाढणार का? BMC ने दिलं स्पष्टीकरण...

Bmc News: खरंच मुंबईत मालमत्ता कर वाढणार का? BMC ने दिलं स्पष्टीकरण...
Bmc Property Tax
Bmc Property TaxSaam Tv
Published On

Bmc Property Tax:

मुंबईत मालमत्ता कर वाढणार, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. यानंतर सामान्यांचीही चिंता वाढली आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

बीएमसीने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम १५४(१क) मधील तरतुदींनुसार मुंबईतील जमिनी व इमारतींच्या भांडवली मूल्यात दिनांक १ एप्रिल २०२० पासून बदल करणे महानगरपालिकेस बंधनकारक होते. तथापि, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करणे वेळोवेळी झालेल्या शासन निर्णय व अधिनियमातील बदल यामुळे पुढे ढकलण्यात आले होते.

Bmc Property Tax
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? उद्या 11 वाजता घेणार निर्णय; खोतकर यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम १५४(१क) व १५४(१ड) मधील तरतुदींनुसार बृहन्मुंबईतील जमीन व इमारतींच्या भांडवली मुल्यात दिनांक १ एप्रिल २०२३ पासून बदल करून वर्ष २०२३-२४ करिता मालमत्ता कराची देयके निर्गमित करणे महानगरपालिकेस बंधनकारक आहे. (Latest Marathi News)

भांडवली मूल्य निश्चितेचे नियम तयार करणे यादृष्टीने प्राथमिक अभ्यास महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आला आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नियम निश्चितीकरिता खात्याअंतर्गत समिती तयार करण्यात येणार आहे.

Bmc Property Tax
India vs Bharat Row: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, पंतप्रधान मोदींचे खासदारांना आदेश

सबब, याअनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या करवाढीबाबतच्या बातम्या निराधार आहेत. तसेच मसुदा तयार करण्याचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे विविध माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या जनमानसात दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई पालिकेने दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com