Manoj Jarange Patil: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? उद्या 11 वाजता घेणार निर्णय; खोतकर यांनी दिली महत्वाची माहिती

Maratha Reservation Protest: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? उद्या 11 वाजता घेणार निर्णय; खोतकर यांनी दिली महत्वाची माहिती
Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Manoj Jarange Health Latest Updates in MarathiSaam TV

Maratha Reservation Protest:

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषण मागे घेऊ शकतात. माजी मंत्री शिवसेना (शिंदे गट) नेते अर्जुन खोतकर यांनी यांनी आज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अशी शक्यता व्यक्त केली आहे. तसेच उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगे हे मोठा निर्णय घेऊ शकतात, असंही ते म्हणाले आहेत.

अर्जुन खोतकर म्हणाले आहेत की, आज सकाळपासून मी आणि राजेश टोपे आम्ही दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात होतो. 10 फोन तरी झाले असतील. ज्यासाठी आंदोलन केले, त्यातल्या काही गोष्टी मार्गी लागल्या आहेत. हे मला सांगायला आनंद होतोय.

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Maratha Andolan: 'आरक्षणासाठी पुरावे देतो आजच भेटायला या', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

ते म्हणाले, कुणबी नोंदींच्या संदर्भात जीआर काढला जाईल. ज्या तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्यातला एक जीआर काढला आहे. 90 टक्के लढाई जरांगे यांनी जिंकली आहे. (Latest Marathi News)

'जीआर पाहून निर्णय घेणार'

यातच मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, ''उद्या जीआर पाहून सकाळी निर्णय जाहीर करणार.'' यातच जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय.

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
India vs Bharat Row: 'इंडिया विरुद्ध भारत' वादावर बोलू नका, पंतप्रधान मोदींचे खासदारांना आदेश

'आजच जीआर काढणार'

तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''जरांगे यांच्या आंदोलनातनंतर कुणबी प्रमाणपत्र देण्याची निजाम कालीन नोंदी असणाऱ्या प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 5 सादाससीय कमिटी नेमण्यात आलीय. ही समिती 1 महिन्यात अहवाल सादर करणार. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जातील. आजच जीआर काढून कुणबी दाखले देण्यात येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com