Municipal Election : मोठी बातमी! मतदार यादीत घोळ, मंत्र्यांचेच नाव मतदार यादीत नाही, नवी मुंबईमध्ये गोंधळ

Ganesh Naik latest news : नवी मुंबईमध्ये मतदान सुरू होताच मोठा गोंधळ उडाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचेच नाव मतदार यादीत नसल्याने त्यांना मतदानासाठी केंद्रागणिक फिरावे लागले.
Ganesh Naik latest news
Ganesh Naik latest news Saam Tv
Published On

Ganesh Naik name missing from voter list in Navi Mumbai : मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. पण पहिल्या तासातच ईव्हीएम मशीनमध्ये अनेक ठिकाणी बिघाड झाल्याचे समोर आले. तर मुंबईमध्ये दुबार मतदार सापडलाय. त्याशिवाय मतदार यादीत घोळ असल्याचेही समोर आले आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचेच नाव मतदार यादीत नसल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर गणेश नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. (Navi Mumbai municipal election updates)

वनमंत्री गणेश नाईक यांचं मतदार यादीत नाव नसल्याने मतदानासाठी केंद्रात गोंधळ उडाला. मंत्री गणेश नाईक यांना मतदानासाठी या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावे फिरावे लागल्याचा प्रकार समोर आला. यावर गणेश नाईक यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, मी आमदार मंत्री असून मतदान करावे की नाही हा प्रश्न पडला आहे. मतदानासाठी नेमके केंद्र कोणते हा गोंधळ सुरू असल्याने गणेश नाईक यांना परिवारासह फिरावे लागले.

Ganesh Naik latest news
Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोरच मतदान केंद्रावर मतदार यादीचा घोळ समोर आला. नवी मुंबई शहरामध्ये काही ठिकाणी दादागिरी झाली आहे. मात्र ते पोलिसांनी ती मोडीत काढली आहे. काही लोक रात्री आलेले आहेत ते दास्तावलेले आहेत, असा टोला त्यांनी साम टीव्हीशी बोलताना शिंदेंना लगावला. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बुधवारी रात्री नवी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

Ganesh Naik latest news
मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

नवी मुंबईत २० लाख पकडले -

मतदानाच्या आदल्य रात्री नवी मुंबईतील सीबीडी येथे २० लाख रूपयांची रक्कम पकडण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रात्री ही कारवाई केली. सीबीडी येथील कोकण भवन सर्कलवर गाडी चेक करताना इनोव्हा गाडीत २० लाख रूपये भेटले. पोलिसांकडून या पैशांचा तपास कऱण्यात येत आहे.

Ganesh Naik latest news
Mahapalika Election : ...तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती, प्राजक्ता माळीनं केलं आवाहन | Video

पनवेल महानगर पालिकेची आज निवडणूक

राज्यभरात एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी पनवेल महानगरपालिकेत यंदा 5 लाख 54 हजार 578 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 656 मतदान केंद्र उभारण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचारी तैनात आहेत. मागील काळात भाजपची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेवर यंदा महाविकास आघाडी देखील तेवढ्यात ताकदीने उतरली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यंदा होणार आहे. त्यामुळे 2 लाख 94 हजार 821 पुरुष तर 2 लाख 59 हजार 685 महिला यावेळी मतदानाचा हक्क बजावणार असून 72 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यासाठी एकूण 78 जागांसाठी ही निवडणूक होत असून 246 उमेदवार रणांगणात उतरलेत.

Ganesh Naik latest news
Nashik : मतदानाआधी शिंदेंच्या उमेदवारवर गुन्हा दाखल, अपहरण करतानाचा CCTV व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com