Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Father daughter drowning news : मकरसंक्रांतीच्या दिवशी विरारमधील बरफपाडा येथे खदाणीत बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाहुण्यांकडे गेलेले विनायक सितप आणि त्यांची मुलगी ईकांशा यांचा या दुर्घटनेत अंत झाला असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
Drowning Case
Drowning CaseSaam Tv News
Published On

Makar Sankranti tragedy Maharashtra : मकरसंक्रातीच्या सणाच्या दिवशीच मुंबईतील विरारमध्ये आक्रीत घडलं. वसई पूर्वमधील बरफपाडा भागात खदाणीत बुडून बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विनायक सितप आणि ईकांशा सितप असे मृताची नावे आहेत. सितप हे जोगेश्वरी येथे राहतात, मकरसंक्रातीला बरफपाडा येथे पाहुण्यांकडे गेले होते. त्यावेळी खदाणीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर सितप कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. पोलिसांकडून या घटनेची अपघाती नोंद करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या सणाच्या दिवशी अशी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

४५ वर्षीय विनायक सितप हे बुधवारी दुपारी ३ वाजता खदाणीत पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने विनायक बुडायला लागले. वडील बुडत असल्याचे पाहि्यानंतर मुलीने धाडसाने पाण्यात उडी मारली. पण तिलाही पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ बचावपथकाला फोन केला पण तोपर्यंत उशीर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह पाहेर काढले. विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला.

Drowning Case
मोठी बातमी! ३००० नाहीच, लाडकीच्या खात्यात ₹१५०० खटाखट येणार, राज्य सरकारला आयोगाकडून निर्देश

बरफपाडामध्ये पाहुण्यांकडे गेलेले विनायक सितप दुपारी पोहण्यासाठी एका खदाणीत उतरले होते. पण खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बापाला वाचवण्यासाठी मुलगी ईकांशाने धाव घेतली अन् कोणताही विचार न करता उडी मारली. पण खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही या खदाणीत बुडाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली. विरार पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने बाप आणि लेकीचा मृतदेह शोधून काढला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची दुर्घटनेचा गुन्हा दाखल करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले.

Drowning Case
Cash For Votes : महापालिका निवडणुकीत मतांची किंमत 3 हजार, नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com