मोठी बातमी! ३००० नाहीच, लाडकीच्या खात्यात ₹१५०० खटाखट येणार, राज्य सरकारला आयोगाकडून निर्देश

Ladki Bahin Yojana December installment ₹1500 latest news : आचारसंहिता लागू असल्याने संक्रांतीला 3000 रुपये जमा होणार नाहीत, तर डिसेंबरचे 1500 रुपयेच खात्यावर येणार आहेत.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार 1500; तारीख आली समोर
Ladki Bahin Yojana Installment Date Saam Tv
Published On

Ladki Bahin Yojana January installment update Maharashtra : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर संक्रातीला ३००० रूपये येणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झालेय. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहि‍णींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचे मंत्र्‍यांकडून सांगण्यात आले होते. त्यावर काँग्रेसने आयोगात धाव घेतली होती. आचारसंहितेच्या काळात अग्रिम स्वरूपाचा लाभ कसा देता येईल? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली. आयोगाने सरकारला लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे १५०० रूपयेच जमा होणार आहेत. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो, असं म्हटले जातेय. (Ladki Bahin Yojana latest update)

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार 1500; तारीख आली समोर
Cash For Votes : महापालिका निवडणुकीत मतांची किंमत 3 हजार, नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार 1500; तारीख आली समोर
Dombivli Violence : मतदानाआधी डोंबिवलीत रक्तरंजीत राडा, कोयत्याने हल्ला, पैसे वाटपावरून भाजप-शिवसेना शिंदेसेना आमनेसामने

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट! 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार,” अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजने संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार 1500; तारीख आली समोर
'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

“राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे,” असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळविले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार 1500; तारीख आली समोर
'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com