Cash-for-votes allegations in Dombivli civic polls : महापालिका निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार रुपयांची वाटप केली जात असल्याचं उघड झालंय. नेमकं कुठं कुठं पैसे वाटणाऱ्यांचा भंडाफोड झालाय. आणि पैसे वाटपावरुन कसं राजकारण तापलंय, पाहूयात...
ही लोकशाहीची धिंडेवडे काढणारी दृश्ये आहेत डोंबिवलीतील. निवडणुकीच्या प्रचारावेळीच प्रत्येकी 3 हजार रुपयांची पाकिटं वाटताना शिंदेसेनेनं भाजप कार्यकर्त्यांना रंगेहात पकडून पोलिसांकडे दिलंय... एवढंच नाही तर डोंबिवलीतील काही भागात 5 हजार रुपयांचं पाकिट वाटलं जात असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केलाय.
दुसरीकडे सांगलीतही पैसे वाटपावरुन राडा झालाय.. तर थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा अत्तार नायकवडी यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. मात्र इद्रिस नायकवडींचा मुलगा अतहर नायकवडींवर पैसे वाटपाचे आरोप केल्यानंतर स्वतः इद्रिस नायकवडी मुलासाठी ढाल बनून पुढे आलेत.त्यांनी पैसे वाटपाचे आरोप फेटाळून लावलेत.आता हे फक्त डोंबीवली आणि सांगलीपुरतंच मर्यादित नाही तर लातूरमध्येही भाजप उमेदवाराच्या नातेवाईकानं पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीसह रोख रक्कम ताब्यात घेतलीय.
पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करत भाजप उमेदवाराच्या मुलानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केलीय. तर याआधीच पुण्याच्या बाणेर परिसरात मतदारांना पैसे वाटपाचा प्रकार समोर आला होता.
खरंतर निवडणूक निर्भयपणे आणि कुठल्याही अमिषाविना लढणं आवश्यक असतं. मात्र साड्या, दारु, मटण आणि नोटांचा धुरळा निवडणुकांमध्ये उडताना पाहायला मिळतोय. नगरपालिका निवडणुकीत तर एका मतासाठी 15 ते 20 हजार रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढं सगळं घडत असतानाही त्याला पायबंद घालण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरलाय. मात्र 5 वर्षांसाठी देण्यात येत असलेल्या एका मताची किंमत 3 हजार असेल तर 1 रुपये 64 पैसे एका दिवसाची किंमत ठरतेय. त्यामुळे मतदारांनीच विचार करावा की 1 रुपया 64 पैशात राजकीय गुलाम बनायचं की आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.