Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO

Pune Footpath Women Viral Video News : पुण्यातील फुटपाथवरून दुचाकी नेणाऱ्या तरुणाची पुणेकर महिलेने उपहासात्मक पद्धतीने ‘आरती’ करत कानउघाडणी केली. हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO
Pune newsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात फुटपाथवरुन गाडी नेणाऱ्या तरुणापुढे महिलेने हात जोडले

  • वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका चालकाने हा व्हिडिओ शूट केला

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणेरी ठसक्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत

  • पुण्यातील ट्राफिक समस्या जैसे थेच

असं म्हणतात नियमांची पायमल्ली केली तर चोखंदळ पुणेकर तुमचा कसा आणि कुठल्या ही थराला जाऊन अपमान करू शकतात हे सांगू शकत नाही. मग तो अपमान कधी उपहासात्मक असू शकतो, कधी थेट तुमच्या कानशिलात लावणारा सुद्धा असू शकतो किंवा कधी घोर अपमान करणारा सुद्धा असू शकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटपाथ वरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणाला महिलेने खोचक शब्दात सुनावले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, रस्त्यावर ट्राफिक असल्याने काही तरुण फुटपाथवरून गाडी घेऊन जात आहे. याचदरम्यान अनेक पादचारी देखील त्या फुटपाथवरून जात आहे. अशाच पादचाऱ्यांमधील एका महिलेने फुटपाथवरून गाडी घेऊन जाणाऱ्या तरुणांपुढे हात जोडले आणि नंतर त्यांची हाताने आरती ओवाळली.

Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO
Railway News : बॅग भरो निकल पडो! रेल्वे प्रवाशांना नववर्षाआधीच मोठी भेट, 'या' मार्गांवर धावणार अतिरिक्त ट्रेन, वाचा वेळापत्रक

यानंतर ही महिला या तुमची आरती करते म्हणत दुचाकीस्वारांच्या मागे पळाली. या घटनेचा व्हिडिओ वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका वाहन चालकाने केला असून पुण्यातील पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेकरांसाठी वाहतूक कोंडीची समस्या नवीन नसून ती कमी होण्याऐवजी वारंवार वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी उपाययोजनांची आश्वासन दिली मात्र रस्त्यांची अवस्था जैसे थे च आहे. पुण्यात लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत देखील तितकीच वाढ होत आहे. दरम्यान या व्हिडिओमधून अस्सल पुणेकरी ठसका नेटकऱ्यांना पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com