Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

Borivali viral video : बोरिवलीतील एका फळ विक्रेत्याच्या दुकानातील असल्याचा दावा करण्यात आलेल्या व्हायरल व्हिडिओमुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये उंदीर फळे कुरतडत असल्याचा दावा केला जात आहे.
Borivali viral video
Borivali viral videoSaam TV
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Borivali fruit shop viral video truth : मुंबईकरांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओद्वारे केला जात आहे. बोरिवली (पश्चिम) परिसरातील एका फळविक्रेत्याच्या दुकानाचा असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये काही फळांवर उंदीर ताव मारताना आणि फळे कुरतडताना दिसत आहेत. या कथित उंदरांनी कुरतडलेल्या फळांचीच ग्राहकांना सर्रास विक्री केली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.

उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या अत्यंत गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईकरांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Borivali viral video
Pune : ३ पानांची सुसाईड नोट आणि व्हिडिओने खळबळ! धंगेकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप आक्रमक; म्हणाले, तोंड लपवून...

यापूर्वीही फळांना कृत्रिम चमक आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर केल्याचे, तसेच काही ठिकाणी फळे आणि भाजीपाला चक्क गटाराच्या पाण्यात धुतल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यामुळे अन्नसुरक्षेचा (Food Safety) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Borivali viral video
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका बोरिवलीतील कोणत्या दुकानाचा आहे आणि त्यामधील दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाकडून या व्हिडिओची आणि त्यातील दाव्यांची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत तपासानंतरच या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com