Breaking : मुंबईत अतिमुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Vikhroli Landslide Today: आज सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळीत दरड कोसळली आहे. विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी आहेत.
Vikhroli Landslide Today
Vikhroli Landslide TodaySaam Tv
Published On

आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस खूप जोरात पडत आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल आहेत. अशातच या पावसामुळे विक्रोळीत दरड कोसळली आहे. विक्रोळीतील पार्क साइड भागात ही दरड कोसळली आहे. (Vikhroli Landslide Today)

विक्रोळीत दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.या चारही जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे मात्र, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या या धो-धो पावसामुळे दरड कोसळली आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. (Vikhroli Park Side Landslide)

Vikhroli Landslide Today
Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

विक्रोळी भागात दरड कोसळली आहे.यामध्ये एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस दाखल घटनास्थळी दाखल झाले आहे. यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळेआजूबाजूचा परिसर देखील केला आहे.

नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.लशालू मिश्रा (१९ वर्षे), सुरेश मिश्रा (५० वर्षे) असं मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे आहेत. तर आरती मिश्रा आणि रुतुराज मिश्रा हे गंभीर जखमी आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Vikhroli Landslide Today
Solapur Rain : दक्षिण सोलापुरात पावसाचा हाहाकार; अनेक गावांना फटका, शेतात पाणीच पाणी

कोल्हापूर- रत्नागिरीला जोडणाऱ्या घाटात दरड कोसळली

कालपासून सुरु असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तर अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. या पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे या महामार्गारील वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड काढण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोडींचा सामनादेखील सर्वसामान्यांना करावा लागत आहे.

Vikhroli Landslide Today
Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com