Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा

Pune Graduate Election: पुण्यातील डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट राजकारणात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यांनी स्वत:च संधी मिळाल्यास नक्की राजकारणात येईल असे सांगितले.
Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा
Saam Tv
Published On
  • विद्यानंद बापट राजकारणात येणार असल्याची चर्चा

  • कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी यासंदर्भात पोस्ट केली होती

  • विद्यानंद बापट यांनी देखील संधी मिळाल्यास राजकारणात येणार असल्याचे सांगितले

  • पुणे पदवीधर निवडणूक २०२६ विद्यानंद बापट लढवणार असल्याची चर्चा

सचिन जाधव, पुणे

पुण्यात डीजे आणि डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या विद्यानंद बापट हे पुन्हा चर्चेत आले आहेत. विद्यानंद बापट हे राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून बापट निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि विद्यानंद बापट यांच्यात चर्चा झाली. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर बापट यांच्या राजकारणात येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या. आज विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठा खुलासा केला. 'संधी मिळाल्यास नक्की भविष्यात राजकारणात येऊ. पण राजकारणात विचारांच्या अनेक मर्यादा असतात.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

विद्यानंद बापट हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्यात सुरू आहेत. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि विद्यानंद बापट यांच्यात चर्चा झाली. वकील असीम सरोदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'विद्यानंद तातडीने विचार करणारा नाही त्यामुळे तो वेळ घेऊन यावर आपलं मत मांडेल. सध्या राजकारणात कशी लोक आहेत माहिती आहे त्यामुळे विद्यानंद सारखे लोक हवी आहेत. मी टाकलेल्या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मोठ्या राजकीय पक्षाकडून ही याबाबत मला विचारणा झाली आहे. पण मी आता नाव घेणार नाही.'

Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा
Maharashtra Politics: मोठी बातमी! राहुल गांधींचा एक फोन अन् निर्णय बदलला, राहुल बोंद्रेचा भाजप प्रवेश अखेर रद्द

‘विद्यानंद बापटने पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का?’ असा सवाल असीम सरोदे यांनी पुणेकरांना केला होता. ध्वनीप्रदूषणाविरोधात बापट निर्भयपणे भूमिका मांडत असल्याचा असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला होता. विद्यानंद बापट तातडीने विचार करणारा नाही त्यामुळे तो वेळ घेऊन यावर आपलं मत मांडेल. सरोदे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

असीम सरोदे यांनी विद्यानंद बापट यांच्यासोबतचा फोटो शेअर करत केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा 'विद्यानंद बापट'. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर - - - विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट ने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?'

Vidyanand Bapat: मोठी बातमी! विद्यानंद बापट राजकारणात येणार, स्वत:च केला मोठा खुलासा
Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com