Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

Vidyanand Bapat legal notice: धार्मिक श्रद्धा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी नोटीसमधून करण्यात आली आहे.
Vidyanand Bapat
Vidyanand Bapatsaam tv
Published On

मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावलीये. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमधून करण्यात आली आहे. तसेच या मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पुण्यातील गणेशोत्सवात वाजवण्यात येणाऱ्या डीजे साउंड सिस्टिमला विद्यानंद बापट विरोध करत आहेत. यासंदर्भात बापट यांची एक मुलाखत आणि त्यातील काही मुद्दे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Vidyanand Bapat
Vidyanand Bapat: ‘बघणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’; दहीहंडीतील AI व्हिडिओवर विद्यानंद बापटांचा पलटवार

अशाच एका मुलाखतीदरम्यान गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी करण्यात आलेली काही वक्तव्यं अवमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा कायदेशीर नोटीसमधून करण्यात आला आहे.

ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला कोणताही विरोध नसल्याचे ॲड. प्रदीप नाईक यांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा दावा नोटीसमधून मांडण्यात आला आहे.

Vidyanand Bapat
Vidyanand Bapat: DJनंतर आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांकडे मोर्चा; विद्यानंद बापटांचा इशारा

एका व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे विद्यानंद बापट यांनी नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करून हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी ॲड. प्रदीप नाईक यांनी केलीये आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com