

ध्वनीप्रदूषण आणि DJच्या मोठ्या आवाजाविरोधातील भूमिकेमुळे विद्यानंद बापट चर्चेत आहेत.
दहीहंडीच्या काळात सोशल मीडियावर त्यांचा AI निर्मित व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात आले.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना बापट यांनी ‘बघणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते’ असं म्हटलं.
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्यानंद बापट यांनी डीजेच्या वापरला विरोध केला. बापटांनी आपली भूमिका अनेक माध्यमांसमोर ठामपणे मांडत आहेत. ध्वनीप्रदूषणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे बापटांना मारहाण देखील झाली.
या सर्व घटनेनंतर देखील ते डीजेच्या विरोधात लढत राहणार असल्याचं बापट म्हणालेत. अशातच आता सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल झाला. आता त्यावर विद्यानंद बापट यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात साम टीव्हीश बोलताना बापट म्हणाले की, बघणाऱ्यांची कीव येतेय.
डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच डीजेवर नाचवल्याचा एआय व्हिडीओ समोर आलाय. त्यात बापट यांनाच नाचवताना पहायला मिळालं आहे, या व्हिडिओवरती विद्यानंद बापट ते म्हणाले, आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आलाय. त्याला डीप फेक म्हणतात, त्यामध्ये काय वाटेल ते व्हिडिओ फोटोज आणि किंवा म्हणजे इमेजेस म्हणा या बनवल्या जातात, त्या सगळ्यावरती मी कशाला प्रतिक्रिया करू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही व्हिडिओ व्हायरल झाले होते. मला बघणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. पण व्हिडिओ व्हायरल होण्यावरून मला काहीच वाटत नाही मला बघणाऱ्यांच्या बुद्धीची वाटते.पब्लिक पर्सनॅलिटी बनता तेव्हा असं होतं. त्याला आमचा विरोध चालूच आहे. माझा काही संबंध नाही. सोशल मीडिया वरती अनेक मीन्स मला पाहायला मिळतात.
माझे फेक अकाउंट तयार केलेले आहेत व्हाट्सअप सोडलं तर मी सोशल मीडिया वापरत नाही. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बघणार आणि काय दृष्टिकोनातून बघावं. कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं. मनोरंजनातून बघायचं कसं बघायचं.. हे गांभीर्याने बघत असेल तर त्याला अर्थ आहे. करणाऱ्याचा अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.