5 तास ठाण्यातच ठेवले; 73 वर्षीय नागरिकाला ठाण्यातच ब्रेन स्ट्रोक, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

Versova Police Negligence Case Elderly Brain Stroke Mumbai: वर्सोवा पोलीस ठाण्यातील कथित निष्काळजीपणामुळे 73 वर्षीय नागरिकाला ब्रेन स्ट्रोक आल्याचा आरोप; प्रकरणी एसीपी स्तरावरील चौकशी सुरू.
Sharad Kadam, 73, allegedly suffered a brain stroke after being kept at Versova police station for hours; ACP-level inquiry underway.
Sharad Kadam, 73, allegedly suffered a brain stroke after being kept at Versova police station for hours; ACP-level inquiry underway.saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका अपघातानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजप नगरसेवक रोहन राठोड यांचे नातेवाईक शरद कदम (वय 73) यांच्या कारची एका महिला डॉक्टरच्या कारला धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Kadam, 73, allegedly suffered a brain stroke after being kept at Versova police station for hours; ACP-level inquiry underway.
बारामतीत राजकीय भूकंप! राष्ट्रावादीच्या 'या' बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा; ZP मधील प्रकरण भोवले

महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसांनी शरद कदम यांना ताब्यात घेतले. तक्रारदार महिलेने कदम हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात असताना कदम यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतरही पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात न दाखल करता सुमारे पाच तास पोलीस ठाण्यातच बसवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि नगरसेवक रोहन राठोड यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने शरद कदम यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sharad Kadam, 73, allegedly suffered a brain stroke after being kept at Versova police station for hours; ACP-level inquiry underway.
भाजपच्या विरोधात शिंदेसेनेचे जोरदार आंदोलन, सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात, नगरसेवक थेट महापालिकेच्या गेटवर चढले

या प्रकरणी अमित साटम यांनी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण घटनेची एसीपी स्तरावरील चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीत पोलिसांची निष्काळजीपणा किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील निष्काळजीपणाचे आरोप सध्या तक्रारीवर आधारित असून, त्याबाबतची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com