समुद्रकिनारी आढळला पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Unidentified Man Found Dead In Sewn Sack At Versova Beach: मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह समुद्रात फेकल्याचा पोलिसांना संशय असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VERSOVA BEACH  CASE:
VERSOVA BEACH CASE:saam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा समुद्रकिनारी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देवाची वाडी येथील जेपी रोडवरील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

VERSOVA BEACH  CASE:
प्रेमानंद महाराजांच्या शिष्यानं उचललं टोकाचं पाऊल; गुप्तांगाला जखम अन् खोलीत ग्राइंडर आढळल्याने खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४५ वाजण्यापूर्वी ही घटना घडली असावी. वर्सोवा येथील देवाची वाडी ते जेपी रोड परिसरात सागर कवच बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी दीपक भास्कर निकाळजे हे समुद्रकिनारी असताना काही नागरिकांनी त्यांना समुद्रकिनाऱ्यावर एक पोते वाहून आल्याची माहिती दिली. या पोत्यामध्ये काहीतरी वस्तू बांधलेल्या अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

VERSOVA BEACH  CASE:
Shocking : टिटवाळ्यात भयंकर घडलं! बंद खोलीत आढळला डॉक्टरचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा उघडला अन्...

या माहितीची खातरजमा केल्यानंतर निकाळजे यांनी दूरध्वनीद्वारे पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर पोलीस ठाण्याचे अंमलदार, दिवसपाळी पर्यवेक्षक आणि प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पथकाच्या मदतीने पोत्याची तपासणी केली असता ते शिवलेल्या अवस्थेत असल्याचे आढळले. त्यानंतर ब्लेडच्या साह्याने पोते उघडण्यात आले. त्यामध्ये अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

VERSOVA BEACH  CASE:
Beed : परळीतील आयटीआय परिसरात आढळला मुलाचा मृतदेह,एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले. पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर संबंधित व्यक्तीला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याची ओळख लपवण्यासाठी तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात बांधून समुद्रात फेकण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, तिची ओळख निश्चित करण्यासह मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक अमर ढेंगे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com