योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Youth found dead at Parli ITI campus : पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या एका तरुणाचा परळी येथील शासकीय आयटीआय (ITI) कॉलेज परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आकाश राम खाटिक (रा. वडगाव दाभाडी, ता. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) परळीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आकाश खाटिक याचे त्याच्याच गावातील एका १७ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. मात्र, या संबंधांना मुलीच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला आकाशशी बोलण्यास सक्त मनाई केली होती.
काही दिवसांपूर्वी आकाशने त्या मुलीची भेट घेऊन "तू माझ्याशी का बोलत नाहीस?" अशी विचारणा केली होती. या वादातून त्याने मुलीवर विळ्याने हल्ला केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाश खाटिकविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकाशवर गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ७५(१), ७६, ७८, १२७(२), ३३३, ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो (POCSO) कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासून आकाश गावातून फरार झाला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते.
गावात अन् परिसरात शोककळा
पोलीस शोधात असतानाच आज सकाळी शासकीय आयटीआय कॉलेज परिसरातील एका झाडाला आकाशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी व आरोपांच्या त्रासातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे.
या घटनेमुळे वडगाव दाभाडी परिसर आणि परळी शहरात शोककळा पसरली आहे. आकाशने हे पाऊल नेमक्या कोणत्या परिस्थितीत उचलले, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.