Vaishnavi Hagawane : हगवणेंना वाचवण्यात पोलिसांचा हात? पोलीस महानिरीक्षक आरोपांच्या घेऱ्यात

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणी पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांचं टेन्शन वाढलंय...कारण दमानियांनी थेट पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप केलेत.. ते नेमके काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Vaishnavi Hagawane News
Vaishnavi Hagawane NewsSaam Tv
Published On

Vaishnavi Hagawane News : हुंड्यासाठी छळ करुन वैष्णवी हगवणेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असतानाच या प्रकरणाला नवं वळण मिळालंय... पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या पाठबळामुळेच हगवणे कुटुंब सुनांची छळछावणी चालवत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय... एवढंच नाही तर हगवणेची मोठी सून मयुरी जगतापने नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेल्या तक्रारीची दखलही सुपेकरांच्या दबावामुळेच घेतली नसल्याचा आरोप दमानियांनी केलाय...

हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल 24 तासांनी पोलीसांनी तक्रार घेतली... मात्र पोलीस कुणाच्या दबावामुळे एफआयआर दाखल करत नव्हते, असा सवाल उपस्थित केला जातोय... एवढंच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी सुपेकरांनीच मदत केल्याची शंका दमानियांनी व्यक्त केली होती.... आता तर दमानियांनी ऑडिओ क्लीप ऐकवत सुपेकरांवर नवा आरोप केलाय.... तर यानंतर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावलेत....

Vaishnavi Hagawane News
Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाचा राज्यात पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनं खळबळ

जालिंदर सुपेकरांचा खुलासा

- गेल्या २ वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात

- पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा पदावर

- कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही

- मी कोणाला सूचना देण्याचा संबंध नाही

- हगवणे कुटुंबाबाबत कोणालाही सूचना दिली नाही

- हगवणेंच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये

- ऑडिओ क्लीप बनवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार

Vaishnavi Hagawane News
तुला माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल अन्...; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, गौप्यस्फोटाने सिनेक्षेत्रात खळबळ

वैष्णवीच्या हुंडाबळीमुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलंय... तिला न्याय देण्याची मागणी केली जातेय.. मात्र पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरही आरोप करण्यात येत असल्याने सरकार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलंय... एवढंच नाही तर हगवणेंसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे....

Vaishnavi Hagawane News
Jalna News : लिकेजमुळे गॅसचा स्फोट अन् होत्याचं नव्हतं झालं, १००-५००च्या नोटा जळाल्या, पाळीव कुत्र्याचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com