Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीचं एकतर्फी प्रेम, तर शशांकच...,हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत मामांचा मोठा खुलासा

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हगवणे कुटुंबीयांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने पती, सासू आणि नणंद यांना परत पोलीस कोठडी सुनावलीय.
pimpri chinchwad vaishnavi hagawane death case
Vaishnavi Hagawane CaseSaam Tv News
Published On

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेतील हगवणे कुटुंबातील पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यावर आज त्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने पुन्हा त्यांना पोलीस कोठडी सुनावलीय. पती शशांक हगवणे,सासू लता हगवणे,करिष्मा हगवणे यांना एक दिवसाची तर सासरे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या हगवणे प्रकरणात मृत वैष्णवीचा मामा उत्तम बहिरट यांनी मोठा खुलासा केलाय.

आत्महत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजुकडील वकिलांमध्ये मोठी खडाजंगी झाली. यावेळी आरोपीकडील वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवला. वैष्णवीचे इतर पुरुषासोबतचे चॅटिंग मोबाईलमध्ये मिळाले असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय. याप्रकरणी वैष्णवीचे मामा यांनी मोठा खुलासा केलाय.

pimpri chinchwad vaishnavi hagawane death case
Vaishnavi Hagawane Case: अश्लील व्हिडिओ दाखवत जबरदस्ती, सासूची काळी जादू; राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंदेचा प्रताप उघड

काण म्हणाले वैष्णवीचे मामा?

वैष्णवीच्या मामांचे नाव, उत्तम बहिरट आहे. उत्तम बहिरट यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वैष्णवीच्या मोबाईल चॅटिंग आणि शंशाक आणि वैष्णवीच्या प्रेम प्रकरणाबाबत खुलासा केला. चॅटिग सारखा कुठलाच प्रकार झालेला नाही. चॅटिंग किंवा जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. आता या केसमध्ये दुसरं काही सापडत नाही, त्यामुळे अशी चुकीची माहिती काढली जातेय. दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमच्या मुलीवर आमचा पूर्णपणे विश्वास होता. आमच्या मुलीचे एकतर्फी प्रेम होते. पण शंशाकचं पैशावर प्रेम होतं, असा खुलासा वैष्णवीचे मामा बहिरट यांनी केलाय. तसेच आरोपी हा आरोपी असतो शंशाक गुन्हेगार आहे. कोणी आपल्या गुन्हे कबूल करत नाही. आमचा न्यायत व्यवस्थेवर विश्वास आहे. पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहे. जे आरोप करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. आमच्या वकिलावर आमचा विश्वास आहे, असेही वैष्णवीचे मामा म्हणालेत.

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय

आज कोर्टात युक्तिवाद करताना हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तसंच तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा हगवणेच्या वकिलांनी केलाय. आरोपींचे मोबाईल सापडलेले नाहीत. आरोपींचे मोबाईल तपासायचे आहेत. मोबाईलमध्ये अजून काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ते हत्यारे आणि रॉड हस्तगत करायचे आहेत‌. आत्तापर्यंत योग्य दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com