सूरज मसूरकर, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई देखील पिंजून काढायला सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांची चांदिवली विधानसभा मतदारसंघात सभा होती. या भागातील सभा आटोपून घरी निघताना एका अज्ञाताने मुख्यमंत्री शिंदे यांना अपशब्द वापरले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा संताप अनावर होत पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चांदिवली विधानसभेची सभा आटोपून निघत असताना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अपशब्द वापरले. या व्यक्तीचे अपशब्द ऐकताच मुख्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने गाडी थांबवून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले.
काँग्रेसचे उमेदवार आरिफ खान यांच्या प्रचार कार्यालयाबाहेर त्या अज्ञात इसमाने मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरले. त्यामुळे मुख्यमंत्री थेट काँग्रेसच्या प्रचार कार्यालयातच शिरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गाडीतून उतरून काँग्रेस कार्यालयात शिरले.
कार्यलयात शिरल्यानंतर तुम्ही हेच करायला इकडे बसले का? असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केला. यानंतर पोलिसांनी तातडीने अपशब्द वापरणाऱ्याला ताब्यात घेतलं.
मुंबईतील साकीनाका येथील सभा संपवून ९० फूट रस्त्यावर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. संतोष कटके नावाच्या व्यक्तीने काळा झेंडा घेऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: हे रस्त्यावर उतरले. संतोष कटके हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.