Mumbai Crime : 'हॅलो छोटा राजन बोलतोय...'; वाढदिवसाच्या शुभेच्छामुळे ठाकरे गटाच्या नेत्याची पोलिसांत धाव

Mumbai Crime News : मुंबईच्या घाटकोपरमधील एका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला चक्क अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा रंगली आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam tv
Published On

मयुर राणे, मुंबई

Mumbai Crime News :

राजकीय व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीला सर्व क्षेत्रातून वाढदिवासांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो. वाढदिवसांच्या दिवसाला राजकीय नेत्याला दिवसभर मोबाईल कॉलद्वारे शुभेच्छा मिळतात. मात्र, मुंबईच्या घाटकोपरमधील एका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला चक्क अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या घाटकोपरमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला छोटा राजनने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. घाटकोपर पूर्वचे ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास रुपवते यांचा १६ तारखेला वाढदिवस होता.

Mumbai Crime
Crime News : घरफोडीतील सराईत गुन्हेगार ताब्यात; ५ गुन्ह्यांची उकल करत २० लाखांचा माल हस्तगत

विलास रुपवते यांना वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या फोनवर एक कॉल आला. 'भाई बोलतील म्हणून एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या हातात फोन दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने आपण छोटा राजन बोलत आहोत असे सांगितले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर विलास रुपवते यांनी चक्क पोलिसांत धाव घेतली आहे. कदाचित हा विरोधकांचा बदनाम करण्याच्या डाव असू शकतो म्हणून विलास रुपवते यांनी या बाबत पंतनगर पोलीस ठाण्यात पत्र देऊन तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा आता पंतनगर पोलीस तपास करीत आहे.

Mumbai Crime
Shirur Crime : शेजारील घराला कुलूप लावून टाकला दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

पोलीस तक्रारीत विलास रुपवते यांनी काय म्हटलं?

विलास रुपवते यांनी म्हटलं की, 'छोटा राजनचा मोठा गँगस्टर आहे. मी त्याला ओळखत नाही. तरी सुद्धा मला कॉल केला. यामुळे मी घाबरलो. मी राजकारणात काम करत असल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी गँगस्टरशी संबंध जुळविण्याचा प्रयत्न केला असावा'.

Mumbai Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime: शेतीच्या वादातून दगडाने ठेचून केली सख्ख्या भावाची हत्या, भाऊ आणि पुतण्याला अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये लघु उद्योजकाची हत्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये डोक्यात गोळी झाडून लघु उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. उद्योजकाची हत्या करून आरोपी दुचाकीने धुळे सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com