Ulhasnagar : पोहण्याचा मोह जीवघेणा ठरला, मित्रांसोबत फिरायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू; उल्हासनगरमधील घटना

Ulhasnagar News : उल्हासनगर परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा उल्हास नदीत पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ULHASNAGAR TRAGIC INCIDENT 18 YEAR OLD TEEN DROWNS IN ULHAS RIVER
ULHASNAGAR TRAGIC INCIDENT 18 YEAR OLD TEEN DROWNS IN ULHAS RIVERSaam tv
Published On
Summary
  • उल्हासनगरमध्ये १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

  • मित्रांसोबत पोहताना घडली दुर्दैवी घटना

  • पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने अपघात

  • स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

  • पोलिसांकडून तपास सुरू

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगर हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत उल्हासनगर परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा उल्हास नदीत पोहण्यासाठी गेला असताना, बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव रफायल विकटर मानीकेंदी (वय १८, रा. कुर्ला) असे असून, तो आपल्या काही मित्रांसोबत फिरण्यासाठी उल्हासनगर परिसरात आला होता. मज्जा मस्ती करण्यासाठी त्यांनी उल्हास नदीत पोहण्याचा निर्णय घेतला. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रफायल पाण्यात उतरला. मात्र, नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

ULHASNAGAR TRAGIC INCIDENT 18 YEAR OLD TEEN DROWNS IN ULHAS RIVER
Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. याबाबत माहिती मिळताच बचाव पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. काही वेळ चाललेल्या शोधमोहीमेनंतर रफायलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

ULHASNAGAR TRAGIC INCIDENT 18 YEAR OLD TEEN DROWNS IN ULHAS RIVER
Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. रफायलच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवारही हादरून गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अशा ठिकाणी पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com