उल्हासनगरमध्ये कर्मचाऱ्याची हत्या, कर्तव्यावर असताना चाकूने वार, थरारक CCTV VIDEO समोर

Sanitation Worker Stabbed To Death In Ulhasnagar Camp 3: उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 परिसरात कर्तव्यावर असताना सफाई कामगार महादू धनराज जगताप यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.
Police investigate the spot after a sanitation worker was stabbed to death in Ulhasnagar Camp No.3 while on duty.
Police investigate the spot after a sanitation worker was stabbed to death in Ulhasnagar Camp No.3 while on duty.Saam Tv
Published On

अजय दुधाने, साम टीव्ही

उल्हासनगरमध्ये भरदिवसा एका सफाई कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 परिसरातील 11 नंबर पॅनल येथे ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडे काम करणारे सफाई कामगार महादू धनराज जगताप हे नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हा हल्ला पूर्ववैमानस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता, याचाच राग डोक्यात ठेवून या माथेफिरूने त्याच्यावर हल्ला केला. नेहमीप्रमाणे तो परिसरात साफसफाई करत होता. अचानक या माथेफिरुने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी घरातील अनेक लोक त्याला सोडवण्यासाठी धावले. तरी देखील तो सपासप वार करत होता.

Police investigate the spot after a sanitation worker was stabbed to death in Ulhasnagar Camp No.3 while on duty.
Kalyan : कल्याणकर संतापले! भूमाफियांविरोधात चक्क 'म्हैस' घेऊन थेट KDMC कार्यालयात धडक, वाचा नेमकं प्रकरण काय?

जखमी अवस्थेत महादू जगताप यांना तत्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी माथेफिरू व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Police investigate the spot after a sanitation worker was stabbed to death in Ulhasnagar Camp No.3 while on duty.
Pune : शिंदे, शेंडगे अन् काकडे; पुणे महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित, वाचा यादी

दोन दिवसांपूर्वी तरुणावर दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला

उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे .या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. रोशन माखिजा हे गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्र समाधान उत्तम बागुल यांना भेटण्यासाठी अंबिका अपार्टमेंट आणि सेवन स्टार बिल्डिंगमधील गल्लीत उभे होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती अचानक तेथे आले आणि त्यांनी माखिजा यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी “तेरे को पहले ही बोला था ना कि अमित भाई के साथ जो कुछ भी है वो खतम कर… तू पिछली बार बच गया, इस बार नही बचेगा” अशी धमकी देत अमित वाधवासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून हल्ला केला.

त्यातील एका आरोपीने हातातील दगडाने माखिजा यांच्या डोक्यावर हल्ला केला. दरम्यान, जखमी अवस्थेत माखिजा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातातील चाकूने त्यांच्या पाठीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत माखिजा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com