वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

BHMS Student Suicide Case In Nanded CIDCO Hostel: नांदेडच्या सिडको परिसरातील खाजगी हॉस्टेलमध्ये बीएचएमएस शिकणाऱ्या 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.
BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.Saam Tv
Published On

नांदेड शहरातील सिडको येथील एका खाजगी हॉस्टेलमध्ये 25 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षा गायकवाड असे तरुणीचं नाव आहे. हडको येथील महाविद्यालयात होमिओपॅथी महाविद्यालयातील (BHMS) द्वितीय वर्षात ती शिकत होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी सिडको येथील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.
BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.Saam Tv

जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती. काल दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मयत आकांक्षा हिने गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून हॉस्टेलची फी थकवली होती. त्यामूळे फी भर म्हणुन जीवन घोगरे पाटील हे मयत आकांक्षा हिला मानसिक त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून तीने आत्महत्या केली. अशी तक्रार मयत आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी दिली.

BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.
Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

त्यावरून सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात जिवन घोगरे पाटील यांच्या विरोधात रात्री उशिरा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको येथील ज्या हॉस्टेलमध्ये ती राहत होती त्याठिकाणी 40 ते 50 मुली राहतात अशी माहिती आहे. विशेष म्हणजे खाजगी हॉस्टेलला कोणतीही परवानगी नसून नियमांचे पालन होत नाही. सुरक्षेच्या उपायोजना देखील नसल्याचे सांगण्यात आले. याची देखील पडताळणी पोलिसांकडून सूरू आहे.

BHMS student Akanksha Gaikwad dies by suicide in a private hostel in Nanded CIDCO area; police register atrocity case against an NCP leader.
Petrol-Disel Rate Hike: LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार, तेल कंपनीच्या 'त्या' निर्णयानं खळबळ

कोण आहेत जीवन घोगरे पाटील?

जीवन घोगरे पाटील यांची राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर घोगरे पाटील हे अजित पवार यांच्या पक्षात गेले. ते अजित पवार यांचे निकटवर्तिय मानले जात असायचे. ते नांदेड महापालिकेचे विरोधीपक्षनेते देखील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com