Crime News
Crime NewsSaam TV

Crime News: उल्हासनगर हादरलं! सख्ख्या भावानेच केली बहिणीची हत्या; पहिल्यांदाच मासिक पाळी येताच चारित्र्यावर संशय

पोलिसांनी निर्दयी भावाला ठोकल्या बेड्या
Published on

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये सख्ख्या भावाने लहान बहिणीची अनन्वित छळ करून हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी या निर्दयी भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात १२ वर्षीय मृत मुलगी ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनी सोबत राहत होती. तर तिचे आईवडील गावी राहतात. या मुलीला काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मासिक पाळी आली. मात्र ते पाहून तिच्या वहिनीने नवऱ्याला चुकीची माहिती दिली.  (Latest Marathi News)

Crime News
Accident News: वरातीत नाचता नाचता हॉस्पिटलमध्ये पोहले; नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडले

तुमच्या बहिणीचे कुठेतरी प्रेमसंबंध असून त्यातून शारीरिक संबंध ठेवल्यानं हा रक्तस्त्राव होत असल्याचं वहिनीने सांगितलं. त्यामुळं या मुलीचा मोठा भाऊ संतापला आणि तब्बल तीन दिवस त्याने बहिणीचा अनन्वित छळ केला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Ulhasnagar Crime)

Crime News
Asaduddin Owaisi on PM Narendra Modi: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून ओवेसींनी PM मोदींवर साधला निशाणा; म्हणाले...

हा छळ सहन न झाल्यानं या १२ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर बजावणे स्वतःच तिला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी (Doctor) याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी (Police) या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com