Asaduddin Owaisi on PM Narendra Modi: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून ओवेसींनी PM मोदींवर साधला निशाणा; म्हणाले...

Asaduddin Owaisi News: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Asaduddin Owaisi on PM Narendra Modi
Asaduddin Owaisi on PM Narendra ModiSaam tv

Asaduddin Owaisi News: 'द केरला स्टोरी' सिनेमावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. 'द केरला स्टोरी' सिनेमावरून एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

'देशाचे पंतप्रधान 'द केरला स्टोरी'च्या चित्रपटाचा प्रसार करीत असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी धुळ्यात केली आहे. (Latest Marathi News)

धुळ्यात त्यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध कार्यक्रमात प्रसंगी असुद्दिन ओबीसी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या संपूर्ण राज्यात आणि देशभरात गाजत असलेल्या 'द केरला स्टोरी' या सिनेमाबाबत बोलताना असुद्दिन ओवेसी म्हणाले, 'केरळची सत्य परिस्थिती अत्यंत वेगळी असून चित्रपटात दाखवलेली परिस्थिती चुकीची आहे. या पद्धतीने अत्यंत वाह्यात पद्धतीचा चित्रपट बनवला असून देशाचे पंतप्रधान त्याचा प्रसार करीत असून ही दुर्दैवी बाब आहे'.

Asaduddin Owaisi on PM Narendra Modi
Ajit Pawar News: 'साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष' म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचे चोख प्रत्यूत्तर, म्हणाले; आमच्या लोकांची...

शरद पवार यांच्या राजीनाम्यावरील घडामोडींवर बोलताना ओवेसी म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असून आपण त्यावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत याबाबत त्यांनी बोलणे टाळले.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संकेत वाढ होत आहे, याबाबत ओवेसी यांना विचारले असता त्यांनी फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना याबाबत विचारणा करायला हवी, देवेंद्र फडणवीस लव्ह जिहादबाबत बोलतात. मात्र, बेपत्ता महिला संदर्भात बोलत नाहीत, अशी टीका ओवेसी यांनी यावेळी केली.

Asaduddin Owaisi on PM Narendra Modi
Nashik News: नाशिकमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे: दादाजी भुसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत आपल्यावर कायम टीका करीत असतात याबाबत विचारले असता, मोदी फक्त सतत टीका करतात, काम मात्र करत नाहीत, अशा शब्दात ओवेसी यांनी यावेळी मोदींवर निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com