CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गट आक्रमक; केसरकरांनी दिला इशारा

शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

मुंबई : पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शिवसेनेनं मोठी कारवाई केली. शिवसेनेनं (Shivsena) थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली. दरम्यान, शिंदे यांना नेतेपदावरून हटवल्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. (Eknath Shinde News In Marathi)

Uddhav Thackeray
विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; राजन साळवींनी भरला अर्ज

उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन हटवणं चुकीचं आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेनं अशी कृती करायला नको होती. शिवसेनेची ही कृती लोकशाहीला शोभणारी नाही. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. (Deepak Kesarkar Latest News)

Uddhav Thackeray
Hyderabad : भाजपच्या बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा; राष्ट्रीय नेत्यांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी सकाळी माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले 'काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत.

मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री झाला असता.

मात्र, त्यावेळी भाजपने (BJP) का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पाठित वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असं ते म्हणत आहेत. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी बंडखोरांना आणि मुख्यमंत्र्यांना सुनावलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com