विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; राजन साळवींनी भरला अर्ज

विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे.
Maharastra Assembly Speaker Election
Maharastra Assembly Speaker ElectionSaam Tv

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. त्यामुळे विधीमंडळात नवीन बदल होत आहे. यामधील महत्वाचा बदल म्हणजे मागच्या काही दिवसांपासून रिक्त असणारं विधानसभा अध्यक्षपद आता लवकरच भरलं जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव निश्चित झालं आहे. (Maharastra Assembly Speaker Election Latest News)

Maharastra Assembly Speaker Election
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना दणका; घेतला मोठा निर्णय

राजन साळवी हे शिवसेनेचे राजापूर मतदारसंघाचे आमदार आहे. दरम्यान, भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी काल अर्ज दाखल केला होता. यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजवी साळवी असा सामना होणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक उद्या ३ जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत होतं. पण ऐनवेळी धक्का तंत्राचा वापर करत भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. शिवाय त्यांचा अर्जही दाखल करण्यात आला आहे.

Maharastra Assembly Speaker Election
Hyderabad : भाजपच्या बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा; राष्ट्रीय नेत्यांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

दुसरीकडे विधानसभा विधानसभा अध्यक्षपदाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपलं मत मांडलं. महाविकास आघाडीकडून अजून दोनं अर्ज दाखल केले जातील आणि अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत विचार करून अर्ज मागे घेतले जातील, असं नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हेदखील अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com