मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना दणका; घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात कामाचा आढावा घेतला.
Eknath Shinde
Eknath Shinde Saam TvNews
Published On

नाशिक: शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेच्या ३९ बंडखोर आमदारांच्या पाठींब्यावर भाजपने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात कालपासून काम सुरु केले आहे. काल शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल मंत्रालयातील कामाचा आढावा घेतला. बंद असलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश यावेळी दिले.

Eknath Shinde
Hyderabad : भाजपच्या बैठकीत फडणवीसांची सर्वाधिक चर्चा; राष्ट्रीय नेत्यांना द्यावं लागलं स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी माजी मंत्री छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या ६०० कोटींच्या कामांना ब्रेक दिला आहे. ६०० कोटींच्या कामांना घाईघाईने मंजूरी कशासाठी दिली, असा प्रश्न नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे यांनी उपस्थित केला.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बैठक घेऊन ५६७ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली होती. यावरुन आरोप करण्यात आले होते.

Eknath Shinde
मुलींनो ब्रँडेड कपडे घालणाऱ्या तरुणांपासून सावधान! अभ्यासातून धक्कादायक खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का!

शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Eknath Shinde News In Marathi )

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षाचे चाळीस हून अधिक आमदार फोडले. त्यानंतर सुरत गाठले. सूरतनंतर गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्यही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 'तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे', असे उद्धव ठाकरेंनी पत्रात लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com