Mumbai News: खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली, परत बाहरे आलाच नाही; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai Shocking News: मुंबईत मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वांद्रे येथे ही धक्कादायक घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mumbai News: खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली, परत बाहरे आलाच नाही; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
Mumbai News Saam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

मुंबईत १४ वर्षीय मुलाचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले होते. या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील मुंबई बँक मेट्रो स्थानक परिसरात घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरात अनेक दुर्घटना घडल्या. यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले तर काहींचा मृत्यू देखील झाला. अशीच एक दुर्घटना मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मुंबई बँक मेट्रो स्थानक परिसरात घडली. याठिकाणी १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Mumbai News: खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली, परत बाहरे आलाच नाही; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
स्ट्रेचरवरून मैदान सोडले, संघ अडचणीत आल्यावर वेदनेसह पुन्हा फलंदाजीला आली; Mumbai Indians च्या स्टार खेळाडूने हवा केली

पावसामुळे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. फैजान परवेज खान (१४ वर्षे) असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी पाण्यात बुडालेल्या मुलाला जवळच्या गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल पूर्व मृत घोषीत केले. या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला.

Mumbai News: खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली, परत बाहरे आलाच नाही; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
Mumbai : शेकडो मुलींचा लैंगिक छळ, न्यूड व्हिडिओ कॉल, नराधम मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला, अन्...

याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. फैजानच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. नागरिकांनी आपल्या मुलांना अशाठिकाणी पाठवू नये, त्यांच्याकडे लक्ष द्याव असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईला रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते. अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. या पावासामुळे मुंबईतील लोकलसेवा, मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. तसंच रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता.

Mumbai News: खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली, परत बाहरे आलाच नाही; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
Mumbai Rain : पावसामुळे मुंबईत मातीचा ढिगारा घसरला, ५ जण मलब्याखाली अडकले, एकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com