मुंबईत ३०००० लोकांचा जीव होता धोक्यात? मोहरम मिरवणुकीतला 'विषारी' कट उधळला, १४,९०० कॅप्सूल जप्त

Toxic Capsules Distributed During Muharram Procession Mumbai: भायखळा पोलिसांनी मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटपाचा मोठा कट उधळून लावत १४,९०० कॅप्सूल जप्त केल्या. एका संशयिताला ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
Mumbai Police seize thousands of suspected toxic capsules during Muharram procession in Byculla
Mumbai Police seize thousands of suspected toxic capsules during Muharram procession in Bycullasaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: भायखळा पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान मोठा संभाव्य घातपाताचा कट उधळून लावत फय्याज प्रेमजी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. उपायुक्त जयंत मीना यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना 'पेन रिलीफ'च्या नावाखाली मिरवणुकीत कॅप्सूल वाटत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड मिसळल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Mumbai Police seize thousands of suspected toxic capsules during Muharram procession in Byculla
Mumbai Water Crisis: मुंबईत पाणीबाणी! BMC कडून नियमावली जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास होणार कारवाई

या कॅप्सूलचे सेवन केलेल्या सलमान सय्यद यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १४,९०० कॅप्सूल जप्त केल्या. तसेच त्याने ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑर्डर दिली होती आणि ५० किलो फॉस्फरस मागवल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

Mumbai Police seize thousands of suspected toxic capsules during Muharram procession in Byculla
Ketan Agarwal Case: सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी, पोलिसांनी विचारलेले ९ प्रश्न कोणते?

आरोपी हा बीबीए पदवीधर असून पुण्यात त्याचा पेंट व्यवसाय आहे. यापूर्वी त्याने इराण आणि इराक या देशांचा दौरा केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, तसेच मोठा घातपात घडवून आणण्याचा त्याचा उद्देश होता का, याचा सर्व बाजूंनी तपास भायखळा पोलीस करत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणामागील नेमका हेतू स्पष्ट झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच, ही कारवाई सेंट्रल झोन १ चे पोलीस उपायुक्त जयंत मीना, एसीपी शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com