Tiger Shroff Firing Case: मोठ्या व्यक्तीला मारायचं होतं, पण प्लॅन बदलला अन् टार्गेटवर 'टायगर' आला! पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा

Tiger Shroff Firing Case: श्रॉफ हा हल्लेखोरांचे सुरुवातीचे टार्गेट नसल्याचा खुलासा प्राथमिक चौकशीतून समोर उघड झालाय. मुंबईतील एका मोठ्या व्यक्तीला मारण्याचा हल्लेखोरांचा प्लॅन होता.
Tiger Shroff firing case latest investigation updates
Tiger Shroff firing case latest investigation updatessaam tv
Published On: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणाच्या चौकशीत मोठा खुलासा झालाय. हल्लेखोरांना बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देश होता, त्याच अनुषंगाने त्यांनी टायगर श्रॉफला थेट जीवे मारण्याचा कट आखला होता असा संशय व्यक्त केला जातोय.

हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी दुसरीच व्यक्ती?

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबार प्रकरणात आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. हल्लेखोरांचे सुरुवातीला टायगर श्रॉफ हा त्यांचा टार्गेट नव्हता. तर मुंबईतील अन्य एका मोठ्या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा त्यांचा कथित कट होता. मात्र, ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज पोहोचता न आल्याने हल्लेखोरांनी टायगर श्रॉफला लक्ष्य केल्याचं माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून हल्ल्यामागील कथित उद्देश आणि नियोजनाबाबत तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Tiger Shroff firing case latest investigation updates
मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

टायगर श्रॉफच्या हालचालींवर सोशल मीडियातून नजर?

टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्राम रील्सचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे. या रील्समधून टायगर श्रॉफ कुठे जातो, त्याच्या हालचाली कशा असतात आणि त्याच्यासोबत सुरक्षारक्षक असतात की नाही, याचा अंदाज घेतला असावा असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केलाय.

Tiger Shroff firing case latest investigation updates
Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

दरम्यान, आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टायगर श्रॉफच्या हालचालींची रेकी केली होती का, सुरुवातीचे लक्ष्य नेमके कोण होते आणि हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येतील. दरम्यान टायगर श्रॉफसोबत नियमितपणे पोलीस बंदोबस्त नसल्याची माहितीही चाहत्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून मिळाली होती. त्यानंतर त्याला टार्गेट करण्यात आल्याचा सांगितलं जातंय.

मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणातील कथित कट, शस्त्रास्त्रांचा स्रोत, संशयितांच्या हालचाली आणि यात इतर व्यक्तींचा काही सहभाग आहे का, याचा तपास करत आहे. या प्रकरणाशी संबंधित अहवालांमध्ये अनिल पंडित याचे नावही समोर आले आहे. तपासकर्ते एका कथित धमकीवजा ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com