

प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात हत्या झाली.
हल्ल्यात गोळीबारासोबत धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला
पोलिस तपासात पप्या शिंदे याला अटक करण्यात आल्याचे वृत्त
29 सप्टेंबर..
वेळ रात्री 9.30 वाजता
ठाण्याच्या मानपा़डा परिसरात ठाकरेसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर आपल्या कार्यालयात पक्षाच्या कामासाठी बसले होते. त्याचवेळी काही आरोपी पूर्णेंकरांच्या कार्यालयाजवळ आले आणि एकापाठोपाठ एक पूर्णेकरांवर सात गोळ्या झाडल्या.. त्यानंतर एकीकडे जखमी प्रदीप पूर्णेकरांना काही कार्यकर्त्यांनी तात्काळ रुग्णालयात नेलं. तर दुसरीकडे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.मात्र चार गोळ्या शरीरात घुसल्यानं पूर्णेकरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनं या हत्याकांडाबद्दल काय सांगितलं ऐका.
पप्या शिंदे आणि आकाश निमसे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलयं.तर संतोष कनोजिया, निखिल यादव हे आरोपी फरार आहेत.तर एका अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे प्रदीप पूर्णेकरांना रुग्णालयात दाखल करताना सोबत असणारा पूर्णेंकरांचा मित्र पप्या शिंदेलाच याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलयं.पप्या शिंदेनेच पूर्णेकरांच्या कार्यालयात बसून आरोपींना हत्येसाठी हिंट दिल्याचाही पोलिसांना संशय आहे.
दुसरीकडे शिंदेसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच पूर्णेकरांना मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप पुर्णेकरांच्या भावाने आणि मुलाने केलाय. आरोपींच्या अटकेसाठी पुर्णेकर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर दीर्घकाळ ठिय्या मांडला. एवढंच नव्हे तर पूर्णेकरांचा मृतदेह अँबूल्न्समधून थेट पोलीस स्टेशनसमोर नेत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
मुळात अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर बांधकामाविरोधात प्रदीप पूर्णेकर आक्रमक भूमिका घ्यायचे.त्यात पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी एक दिवस आधी शेअर केलेल्या इन्स्टा पोस्टची जोरदार चर्चा रंगलीय.त्या व्हिडिओत 'एक तर आपला अध्याय संपेल किंवा नवीन अध्याय सुरू होईल' असं म्हटलं होतं.त्यामुळे प्रदीप पूर्णेकरांना स्वत:वर हल्ला होणार असल्याची कल्पना होती का? असाही प्रश्न निर्माण झालाय.
ठाण्यात याआधीही 1989 मध्ये शिवसेना नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या हत्येनंतर टोकाचा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता.त्यात आता प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येमागे नेमकी कोणती कारणं आहेत. पूर्णेकरांच्या हत्येमागचा खरा मास्टमाईंड कोण आहे? याचा सखोल तपास करण्याची गरज आहे. मात्र यामुळे शिंदेसेना आणि ठाकरेसेतला ठाण्यातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.