

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात तणाव वाढला
आरोपींवर कारवाई करण्यासाठी समर्थक आक्रमक
पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले
आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली
शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकारण तापले आहे. या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पूर्णकरांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. पूर्णकरांच्या समर्थकांनी ठाण्यातील मानपाडा परिसरातील मानपाडा उड्डाणपुलाखाली मंगळवारी रात्रभर रास्तारोको आंदोलन केले. पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे मानपाडाजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी समर्थकांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. परंतु या आवाहनला न जुमानता समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली, जाळपोळ केली आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. या घटनेत काही पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. सध्या ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आहे.
प्रदीप पूर्णकरांच्या समर्थकांनी १६ तासानंतर नौपाडा पोलिस ठाण्याच्या बाहेर केलेले आंदोलन स्थगित केले. पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी नौपाडा पोलिस ठाण्याच्याबाहेरील रस्ता अडवला होता. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. हरी निवास सर्कल मार्ग १६ तास ठप्प करण्यात आला होता. तसेच मानपाडा परिसरात ज्या ठिकाणी प्रदीप पूर्णेकर हे राहत होते त्या मानपाडा परिसरातही समर्थकांनी आंदोलन केलं आणि महामार्ग ६ तास ठप्प करण्यात आला. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिसांना जखमा झाल्या. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावर ताबा मिळवल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, आज ठाण्यातील मानपाडा परिसरात पहाटेपर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. मानपाडा उड्डाण पुलाच्या खाली पूर्णेकर समर्थकांकडून पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.