मित्रांची शक्कल, दिवाळीच्या मुहूर्तावर बनावट नोटा बाजारात आणण्याचा बेत, पुणे पोलिसांनी उधळला प्लॅन

PUNE POLICE BUST DIWALI FAKE CURRENCY RACKET : पुणे पोलिसांच्या विश्रामबाग पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
PUNE POLICE BUST DIWALI FAKE CURRENCY RACKET
PUNE POLICE BUST DIWALI FAKE CURRENCY RACKETsaam tv
Published On: 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात बनावट नोटा छापण्याचा चक्क मित्रांचा एक खतरनाक बेत पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. हुबेहूब खोट्या नोटा तयार करून ती बाजारात आणणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत लाखांच्या बनावट नोटांसह चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

कशी रचली होती खोट्या नोटा तयार करण्याची शक्कल?

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, हे चारही जण मित्र असून, यातील शाफाज फिरोज अन्सारी हा या रॅकेटचा म्होरक्या आहे. अन्सारी यापूर्वीही बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती लागला होता. दिवाळीच्या काळात बाजारात मोठी उलाढाल होत असल्याने, याच संधीचा गैरफायदा घेऊन बनावट नोटा खपवण्याचा या टोळीचा प्लॅन होता.

PUNE POLICE BUST DIWALI FAKE CURRENCY RACKET
Firing In Hotel: हॉटेलमध्ये घुसून बेछुट गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, शहरात खळबळ

हुबेहूब नोटा तयार करण्यासाठी आरोपींनी आधी खरी नोट स्कॅन केली. त्यानंतर रंग, आकार, फॉन्ट आणि डिझाईनचा सखोल अभ्यास करून संगणकीय सॉफ्टवेअरच्या मदतीने ५०० रुपयांची तंतोतंत बनावट नोट तयार केली आणि तिची छपाई सुरू केली.

पोलिसांनी कसा रचला सापळा?

पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी मंडई परिसरामागील रस्त्यावर सापळा रचून सलमान राजे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ८०५ बनावट नोटा आढळल्या.

PUNE POLICE BUST DIWALI FAKE CURRENCY RACKET
Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये

मुंबई ते कोल्हापूरपर्यंत पसरलेले रॅकेट

सलमान राजे याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने विशेष पथक रवाना केले. विश्रामबाग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशाल गलांडे आणि अभिजित कांबळे यांना शिरोळमधून अटक केली. त्यांच्याकडून प्रिंटर, मॉनिटर, सीपीयू, की-बोर्ड, माऊस असा २१ हजार रुपयांचा छपाईचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, मुख्य सूत्रधार शाफाज अन्सारी याच्या घरातूनही ५०० रुपयांच्या आणखी ३२३ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण १ हजार १२८ बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटचे जाळे कोल्हापूर (शिरोळ) आणि नालासोपारा (मुंबई) पर्यंत पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com