Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये

Ulhasnagar Mahanagar Palika: उल्हासनगर महानगर पालिकेने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू केला. या योजनेअंतर्गत मुलींना वर्षाला ६००० रुपये मिळणार आहेत.
Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये
Ladki Vidhyarthini YojanaSaam Tv News
Published On: 
  • लाडकी विद्यार्थिनी योजनेअंतर्गत वर्षाला ६००० रुपये

  • उल्हासनगर महापालिकेकडून ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजनेची घोषणा

  • उल्हासनगरमध्ये विद्यार्थिनींसाठी नवीन आर्थिक सहाय्य योजना

  • सातवी ते बारावीच्या मुलींना दरमहा ५०० रुपये

अजय दुधाणे, उल्हासनगर

लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. फडणवीस सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेच्या धरतीवर उल्हासनगरर महापालिकेकडून 'ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना' जाहीर करण्यात आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून योजना सुरू करण्यात आली आहे.

'ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना' या योजनेंतर्गत सातवी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थिनींना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट दिले जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपये शैक्षणिक मदत मिळणार आहे. यामुळे त्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून योजनेचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.

Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹१५०० की ₹३००० रुपये मिळणार? सप्टेंबर-ऑक्टोबर हप्त्याबाबत राज्य सरकारचा उद्या घेणार मोठा निर्णय

'ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना' ही योजना सुरू होण्यापूर्वी १९ हजार विद्यार्थिनींची नोंद झाली असून पालिकेवर ९ कोटी ८७ हजार रुपयांचा बोजा देखील पडणार आहे. दरम्यान महायुतीच्या माध्यमातून सदरील योजना राबविण्यात येत असली तरी भाजपाचे नगरसेवक आणि उपमहापौर यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत संघर्ष दिसून आला. या योजनेवरून भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या उल्हासनगरमध्ये सुरू आहे.

Ladki Vidhyarthini Yojana: लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू, विद्यार्थिनींना वर्षाला मिळणार ६००० रुपये
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३,००० मिळणार? सप्टेंबर - ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com